भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : खेळाचे प्रमाणपत्र पडताळणी करून श्रेणी निश्चित करून मिळण्यासाठी जेणेकरून त्यांना नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षणाचा लाभ मिळू शकेल या मागणी करिता कयाकिंग व कनोईंग या बोटिंगच्या खेळाडू विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी दिनांक ९ सप्टेंबर पासून साखळी उपोषणावर बसले आहेत व त्यांना न्याय न मिळाल्यास ते १४ सप्टेंबर पासून आमरण उपोषणावर बसणार आहेत, त्यांना भाकपतर्फे व आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन तर्फे पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या शिष्ट मंडळासोबत कॉ.हिवराज उके व कॉ. विश्वजीत बनकर यांनी जिल्हाधिकारी डॉ.संजय कोलते व जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती लतिका लेकूरवार यांची भेट घेतली. जिल्हाधिकाºयांनी उपसंचालक क्रीडा विभाग नागपूर यांच्यासोबत फोनवर चर्चा केली व तात्काळ प्रमाणपत्र पडताळणी करण्याची सूचना केली. याप्रसंगी शिष्टमंडळात खेळाडू विद्यार्थी मुस्कान उके, रूपाली टांगले, ललित वैद्य, करण शेंडे इत्यादींची उपस्थिती होती.