भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : देशातील पंतप्रधान पदाची एक गरिमा आहे. त्यामुळे पंतप्रधान पदावर बसलेल्या व्यक्तींनी ती राखावी अशी देशाची अपेक्षा असते. पण एक पंतप्रधान पदावर बसलेल्या व्यक्तीने देशातील मुख्य न्यायाधीशांच्या घरी गणपतीपूजेच्या निमित्त करून जाणे हे शोभनीय नाही. यामुळे देशातील न्याय व्यवस्थेवरचा जनतेचा विश्वास उडतो. न्याय व्यवस्थेला संशयात्मक पद्धतीने बघितले जात असेल तर हे देशाकरिता योग्य नाही, अशी टीका महाराष्ट्र कॉग्रेसचे प्रभारी रमेश चेनीथल्ला यांनी गोंदियात केली. ते गोंदिया येथील सर्कस ग्राउंड वर आयोजित कांग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा, माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांचा पक्षप्रवेश व नवनिर्वाचित खासदार यांच्या सत्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठ- ावर महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस अध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान, विरोधी पक्ष नेते विजय वडेटीवार, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, डॉ. नितीन राउत, सुनील केदार, सतीश चतुर्वेदी, नवनिर्वाचित खासदार डॉ. प्रश- ांत पडोळे, नामदेवराव किरसान, श्याम बर्वे, माजी खासदार शिशुपाल पटले, मध्यप्रदेश येथील बालाघाट जिल्हयातील आमदार अनुभा मुंजारे, मधु भगत, विक्की पटेल, माजी आमदार हिना कावरे, गोंदिया जिल्हा कॉग्रेस अध्यक्ष व माजी आमदार दिलीप बंसोड आदि उपस्थित होते.