भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : आंभोरा-मौदी येथे वैनगंगा नदिवर बांधण्यात आलेला पुल पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होत आहे. पुलावरील गॅलरीचा ठेका एका संस्थेला झाला असुन त्याचा काम विनोद वंजारी पाहत आहे. मोठ्या प्रमाणावर येणाºया पर्यटकांची गर्दी पाहुन संधीचा फायदा घेत शासनाच्या कोणत्याही विभागाची परवानगी न घेता चार बोटी विकत घेतल्या आणि नदी पात्रात अवैध बोटींग व्यवसाय सुरू केला आहे. बोटीत बसणाºया पर्यटकांच्या सुरक्षेची कोणतीही उपाय योजना करण्यात आली नाही. अपघात होऊन होणाºया हानीसाठी कोण जबाबदार राहील. पर्यटकांच्या होणाºया लुटीवर कोणाचेही लक्ष नाही. याची तक्रार मौदी येथिल गावकºयांनी जिल्हा पोलीस अधिक्षक यांचेकडे केली आहे. हा अवैध व्यवसाय कोणाच्या आशीर्वादने सुरु आहे, अशी गावकºयांत चर्चा आहे. हा अवैध बोटींग व्यवसाय बंद न झाल्यास गावातील परंपरागत बोट चालविण्याचा व्यवसाय करणारा ढीवर समाजसुध्दा आपल्या मच्छीमार संस्थेमार्फत बोटी घेऊन पर्यटनाचा व्यवसाय सुरू करतील अशी माहीती अमृत चांदेकर, जयदेव देवगडे, सुभाष देवगडे, राजु बोंद्रे, महादेव चांदेकर, अनिल वंजारी, सुरेश देवगडे यांनी दिली आहे.