भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : तालुक्यातील बरबसपुरा येथे रेल्वे विभागातर्फे अंडरग्राउंड पुलाचे काम सुरू असताना या कामावर वेल्डिंगचे काम करणाºया एका मजुराचा वेल्डिंग करताना खाली पडून मृत्यू झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी तिरोडा पोलीस स्टेशन येथे घटनेची नोंद करण्यात आली आहे. गिरधारी श्यामलाल मेश्राम (३५)रा. आंबेडकर वार्ड, सिंगल टोली गोंदिया असे मृतक मजूराचे नाव आहे. फियार्दी संतोष यादवराव मेश्राम, रा. बेलाटी बुज यांनी तिरोडा पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे नातेवाईक मृतक गिरधारी श्यामलाल मेश्राम, ३५ वर्ष, राहणार सिंगल टोली, आंबेडकर वार्ड गोंदिया हा रेल्वे विभागातर्फे बरबसपुरा येथे सुरू असलेले अंडरग्राउंड पुलाचे बांधकामावर दि. १२ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६-३० वाजता वेल्डिंगचे काम करीत असताना ट्रॅक्टरवरून तोल जाऊन पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
याची माहिती त्याची मावशी कमलाबाई श्रीधर लांजेवार यांनी दिल्याने त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता त्यांचा नातेवाईक गिरधारी मेश्राम ट्रॅक्टरवर उभा राहून वेल्डिंगचे काम करीत असता ट्रॅक्टर वरून पडून मरण पावल्याची दिसले. याप्रकरणी तिरोडा पोलीसांना माहिती मिळाल्याने त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून प्रेत शवविच्छेदना करता उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे पाठविण्यात आले. तिरोडा पोलिसांना दिलेले फिर्यादीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यू भारतीय न्यायसंहित कलम १९४ नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास हवालदार योगेश कुळमते करीत आहेत. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटंूबियांच्या स्वाधीन करण्यात आले.