भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : तालुक्यातील ग्रामपंचायत वडद येथे गुरूवार १२ ला आमसभा संपन्न झाली. आमसभेत कुणालाही विश्वासात न घेता, कोणताही सुचक अनुमोदक नसता थेट सरपंचबार्इंना तंटामुक्त समिती अध्यक्ष पदी विराजमान करण्यात आले. या प्रकाराने आमसभेत चांगलाच गदारोळ माजला. मनमर्जीने जनतेला न विचारता ग्रामपंचायत मध्ये भोंगळ कारभार असून याची चौकशी करावी यासाठी शुक्रवार ता. १३ ला साकोली विश्रामगृहात ग्रामस्थांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती देत या मनमर्जी प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे. जवळील ग्रामपंचायत वडद येथे गुरुवारी आमसभा झाली. यात ‘तंटामुक्त समिती अध्यक्ष’ निवड करणे हा एकच विषय होता. यात जनतेने ग्रामपंचायत पदाधिकाºयांना सांगितले की, येथील रोजगार सेवक सोविंदा हटवार हे नेहमी अरेरावीची भाषा करून माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष सुरेश कुंडेजवार यांना मानसिक त्रास देऊन शिविगाळ करतात. त्यांनी अगोदर या आमसभेत कुंडेजवार यांची माफी मागावी, नंतरच नविन अध्यक्षांची निवड होईल असे प्रश्न रेटून धरीत चांगलाच दोन तीन तास गदारोळ माजविला. आमसभेला अध्यक्ष म्हणून सरपंच भारती बडवाईक ह्या होत्या.
यावेळी उपसरपंच दिपक कळसकर यांनी कोणताही निर्णय न घेता रोजगार सेवकाला न बोलविता सरपंचा भारती बडवाईक यांना तंटामुक्त समिती अध्यक्षपदावर विराजमान केले. या निवड प्रक्रियेत कुणीही अनुमोदक दिलेले नसतांना सरपंचबार्इंना तंटामुक्त समिती अध्यक्षपदी आरूढ करणारे स्वमर्जीचे मालक हे कोण? या विषयावर ग्रामपंचायत भवनात आयोजित आमसभेत गावकºयांनी निवड प्रक्रियेला विरोध दर्शवून रोष व्यक्त केला. शासनाच्या नियमानुसार गटविकास अधिकारी पत्र आदेश देऊन गावातील एका प्रतिष्ठित शिक्षित व्यक्तीला ‘ग्रामदूत’ निवडते. पण येथेही मनमर्जीने तेही पद आप्त इष्टांना देण्याचे षडयंत्र चालविले जात आहे, असा सणसणीत आरोप घेतलेल्या पत्रकार परिषदेत करीत मागणी केली आहे की, सदर ग्रामपंचायत वडद येथील या प्रकरणाची चौकशी करावी अशी माहिती शुक्रवार १३ सप्टेंबरला साकोली विश्रामगृहात आयोजितपत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी वडद ग्रामवासी सुरेश कुंडेजवार, केदार राऊत, चरण मेश्राम, बाळकृष्ण बडवाईक, बाबूलाल सुर्यवंशी व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.