भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : महिलांचे प्रेरणा स्थान असलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, मॉ.जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राणी लक्ष्मीबाई इत्यादींचा आदर्श प्राची चटपने डोळ्यासमोर ठेवत. बाल वयापासूनच सामाजिक कार्याची व खेळाडू वृत्ती असल्याने शैक्षणिक अभ्यासाबरोबर महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळाला महत्त्व दिले आहे. आणि पारंपरिक खेळ असलेला आट्यापाट्या (लोन) हा खेळ निवडला. गावातील जिल्हा परिषद शाळेत या खेळाचा योग्य सराव करून जिल्हा, विभाग व राज्यस्तर गाठला आहे. तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांबरोबर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना क्रिडा क्षेत्रात नाव लौकिक करण्यासाठी प्राचीने अनेकांना क्रिडाच्या प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने सदैव प्रयत्न करत आहे. तिने महाराष्ट्र राज्याची कर्णधार असतांना तीन सिल्व्हर मेडल मिळवून दिले आहेत.आणि आता ८ वी दक्षिण आशियाई आट्यापाट्या अजिंक्यपद स्पर्धा- २०२४ ला भूतान येथे होऊ घातली आहे. त्यात आट्यापाट्या फेडरेशन आॅफ इंडिया टीमची कर्णधार म्हणून प्राची केशव चटप हीची निवड करण्यात आली आहे. भंडारा तालुक्यातील तिन हजार लोकसंख्या असलेल्या खमारी (बुटी) येथील भूमीहीन, निराधार दुर्गा केशव चटप यांची मुलगी प्राची आहे. प्राची तीन वर्षाची असतांना वडील केशव चटप यांचे निधन झाले.
घरात अठराशेवीस द्रारिद्रय असतांना कुटुंबाचे पालन-पोषण करण्याची जबाबदारी आईवर आली. मात्र आईवडिलांच्या स्वप्नाला तडा जाणार नाही. म्हणून प्राचीने शिक्षणाबरोबर समाजकार्य व क्रिडा क्षेत्रात गावाचे नाव लौकिक करण्याचा निर्धार केला. ती खमारी (बुटी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वर्ग १ ते ४ पर्यंत शिक्षण घेतले. नंतर ५ ते १२ वी पर्यंत बेलगाव येथील कस्तुरबा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेतले आहे. इयत्ता १२ वी विज्ञान शाखेत प्रथम प्राविण्य मिळवले. मात्र खेळाच्या सरावा साठी अपुरा वेळ मिळत होता. म्हणून बीएससी अभ्यासक्रमात प्रवेश न घेता बी.ए अभ्यासक्रम निवडला. विद्यापीठ शिक्षण घेतांंनी विद्यापीठ व सिनियर स्पर्धेत उत्तम कामगिरी बजावली आहे. प्राची आता भंडारा येथील जे. एम. पटेल महाविद्यालयात बी. ए. तृतीय वर्षात शिक्षण घेत आहे. प्राची ला ग्रीष्मकालीन नि:शुल्क संस्कार शिबिरात मिळालेल्या विविध तज्ञ मार्गदर्शकांच्या प्रेरणेने नव्याने बळ मिळाले आहे. अशा प्रकारे प्रतिकूल परिस्थितीत तीने गावाबरोबर जिल्ह्याचे नाव लौकिक केले आहे. अशा ग्रामीण भागातून नेतृत्व करत जिल्हयासह राज्यस्तरीय आट्यापाट्या क्रिडा सत्रात भंडारा जिल्ह्यातील मुलींच्या संघाला द्वितीय स्थान प्राप्त करून दिले. प्राचीने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत जिल्ह्याचे नाव लौकिक केले होते. त्यामुळे राष्ट्रीय खेळाडू म्हणून कु. प्राची चटप ची महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली होती. प्राची चटपने आट्यापाट्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करून महाराष्ट्र संघाचा व्दितीय क्रमांक तसेच फेडरेशन मध्ये महाराष्ट्र व पांडेचेरी तसेच केरळ येथे महाराष्ट्र संघाला व्दितीय क्रमांक पटकाविला आहे. यात महाराष्ट्र संघाला सिल्वर पदकाने गौरविण्यात आले आहे.
एवढेच नव्हे तर प्राची ही नि:शुल्क स्थानिक नुतन कन्या विद्यालय व लाल बहादूर शास्त्री विद्यालय येथील मुलींना आट्यापाट्या या खेळाचे प्रशिक्षण देत आहे. त्यामुळे शालेय क्रिडा स्पर्धेत या शाळेतील विद्याथीर्चा जिल्ह्यात व नागपूर येथे प्रथम व व्दितीय क्रमांक पटकावला आहे. अशा प्रकारे कामगिरी भंडारा जिल्हाच्या प्राची चटपने महाराष्ट्राचे नाव चमकविल्याने जिल्ह्यात सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. राज्यस्तरीय आट्यापाट्या स्पर्धा पांडेचेरी येथील स्पर्धेत महाराष्ट्र संघाला व्दितीय व फेडरेशन मध्ये व्दितीय स्थानी विजय मिळविल्याने महाराष्ट्र संघाने सिल्वर पदक जिंकले आहे. तसेच विविध उपक्रमात सक्रिय सहभाग घेत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी तिच्या कार्याची दखल घेऊन प्राची चा अनेक ठिकाणी गुणगौरव केला जात आहे. एवढेच नव्हे तर प्राची ही नि:शुल्क स्थानिक नुतन कन्या विद्यालय व लाल बहादूर शास्त्री विद्यालय येथील मुलींना आट्यापाट्या या खेळाचे प्रशिक्षण देत आहे. त्यामुळे शालेय क्रिडा स्पर्धेत या शाळेतील विद्याथीर्चा जिल्ह्यात व नागपूर येथे प्रथम व व्दितीय क्रमांक पटकावला आहे. कु. प्राची केशव चटप हीने प्रतिकुल परिस्थितीचा सामना करून आट्यापाट्या खेळात प्राविण्य प्राप्त केले आहे. ती महाराष्ट्र चमूची कर्णधार असतांना महाराष्ट्र संघाला तीन सिल्वर पदक व अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. म्हणून तीची आंतरराष्ट्रीय पातळीवर निवड करण्यात आली आहे.
याच माध्यमातून तीची ८ वी दक्षिण आशियाई आट्यापाट्या अजिंक्यपद स्पर्धा- २०२४ ला भूतान येथे भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. आणि एवढे नाही तर आट्यापाट्या स्पर्धेकरिता भारतीय टीम ची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. अशा प्रकारे कामगिरी भंडारा जिल्ह्याच्या प्राची चटपने महाराष्ट्राबरोबरच भारताचे नाव चमकविल्याने जिल्ह्यात सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. प्राची चटपने आपल्या यशाचे श्रेय आट्यापाट्या फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. व्ही.डी. पाटील, आट्यापाट्या फेडरेशन आॅफ इंडियाचे सहसचिव दिपक कवीश्वर, डॉ.अमरकांत चकोले, कोच व मार्गदर्शक श्याम देशमुख संस्था सचिव डॉ.ललीत जीवानी, पुज्य सिंधी समाज अध्यक्ष जैकी रावलानी तसेच आई दुर्गा चटप, आॅल इंडिया वर्किंग जनार्लिजमचे अध्यक्ष निशांतभाई यांना दिले असुन प्राची चटपचे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार नाना पटोले, डॉ.परिणय फुके, नरेंद्र भोंडेकर, राजु माणिकराव कारेमोरे, जिल्हाधिकारी डॉ.संजय कोलते, जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाळे, जिल्हा पोलीस अधीक्षक नूरूल हसन, जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ, जे.एम.पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विकास ढोमणे, समन्वयक डॉ.कार्तिक पन्निकर, क्रीडा शिक्षक डॉ.भिमराव पवार, रोमी बिष्ट, जिल्हा परिषद सदस्य रजनीश बन्सोड, समीर नवाज, खमारीचे सरपंच नलिनी काळे, राहुल मेश्राम, रामबिलास सारडा, डॉ.गोपाल व्यास, विलास केझरकर भंडारा क्रीडा व युवक मंडळांच्या सर्व पदाधिकारी, खेळाडू तसेच जिल्ह्यातील खेळाडू व नागरिकांनी अभिनंदन केले आहे.