उपराष्ट्रपतींच्या हस्ते आयटीआयमध्ये संविधान मंदिराचे आभासी पद्धतीने उद्घाटन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तुमसर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत १५ सप्टेंबर रोजी संविधान मंदिराच्या उद्घाटन महोत्सव आयोजित करण्यात करण्यात आले होते. यादरम्यान १५ सप्टेंबर रोजी सकाळी ११:०० वाजता देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या प्रमुख हस्ते प्रत्येक आयटीआय महाविद्यालयातील संविधान मंदिराचे आभासी पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. सामाजिक न्यायाची खरी शिकवण ही भारतीय संविधानातून प्राप्त होत असल्यामुळे कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाच्या (मुंबई) अधिपत्याखालील प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणाथीर्ना सामाजिक न्यायाची खरी शिकवण मिळावी यासाठी राज्याचे कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या संकल्पनेतून राज्यातील एकूण ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि तांत्रिक महाविद्यालयात संविधान मंदिरांची स्थापना करण्यात आली.

संविधान मंदिराचे उद्घाटन भारताचे उपराष्ट्रपती धनखड यांच्या हस्ते आॅनलाइन पद्धतीने करण्यात आले. त्याअनुषंगाने तुमसर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सुद्धा संविधान महोत्सव आयोजित करण्यात आले होते. यानिमित्ताने तुमसर आयटीआयमध्ये १५ सप्टेंबर रोजी निबंध, चित्रकला, प्रश्नमंजूषा, रांगोळी, भाषण व इतर स्पर्धा तसेच तालुक्यातील संविधान अभ्यासक व सामाजिक कार्यकर्ते यांचे भारताचे संविधान विषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच स्पर्धेत सहभागी होऊन प्रथम क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष, तथा माजी जिल्हा परिषद सदस्य खेमराज पंचबुद्धे, प्रमुख अतिथी राहुल डोंगरे, स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित एच मेश्राम, बार कौन्सिल असोसिएशनचे अध्यक्ष विलास माटे, संस्था व्यवस्थापण समितीचे सदस्य प्रमोद पालटकर, अश्विन देशमुख, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्रभारी गटनिदेशक ओमप्रकाश इप्पर, भास्कर बाचकर, सरिता धनविज, शासकीय तंत्र माध्यमिक शाळा महाविद्यालयाचे संजू लोहे, अतुल डोंगरवार, पल्लवी बोरकर, चेतना पराते, अमोल हिंगे, विशाल धंडारे, अर्चेस बिसने, शालिनी कटरे, रविना साखरवाडे, वंश पांडे, शेखर हिंगे, अश्विन बनकर यासह कार्यक्रमाला आजी-माजी प्रशिक्षणार्थी, सामाजिक कार्यकर्ते व संविधान प्रेमी नागरिकांनी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *