भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : येथील विकास फाऊंडेशनच्या जिल्हा मुख्यालयात दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा दि. ७ सप्टेंबर २०२४ रोजी मंगलमुर्ती श्रीगणेशाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या निमित्तत विविध कार्यक्रम साजरा करतांना शासकीय रुग्णालयात नेहमीच असणारी रक्ताची कमतरता लक्षात घेऊन दानात दान रक्तदान सारख्या सामाजिक उपक्रमाचे यशस्वी नियोजन व कार्यक्रमाची आखणी करीत रक्तदान करण्याचे आवाहन विकास फाउंडेशन तर्फे करण्यात आले. यावेळी २९ रक्तदात्यांनी रक्तदान करीत सामाजिक उपक्रमात भाग घेऊन गरजू रुग्णाची रक्ताची गरज भागविण्याचे सेवाभावी कार्य केल्याबाबत संस्थापक अध्यक्ष माजी आ. चरण वाघमारे यांनी रक्तदात्यांचे आभार मानले. तसेच याप्रसंगी विकास फाऊंडेशनच्या महिलांचा कार्यकर्ता मेळावा यावेळी घेण्यात आला.
याप्रसंगी विजयश्री वाघमारे यांनी महिला कुठल्याही क्षेत्रात मागे नसुन आज प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटविला आहे.महिलांनी कौंटुंबि जबाबदारी सांभाळतांना सामाजिक कार्यातसुध्दा सकि- ्रय राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी भंडारा जि.प. सभापती राजेश सेलोकर,पं.स.सभापती नंदु रहांगडाले, विजयश्री ट्रस्ट चे अध्यक्ष विजयश्री चरण वाघमारे, डॉ. शांताराम चाफले,संचालक कृउबास रवींद्र बाभरे, हिरालाल नागपुरे, बबलु मलेवार,ललित शुक्ला, राजेश पटले, राजेंद्रजी तुरकर, अनिल जिभकाटे, हिरालाल रोटके, हरिश्चंद्रजी बंधाटे, पं.स.तुमसर सदस्या पल्लवी ताई कटरे, पं.स.सदस्या छाया ताई तडस, किरणताई भैरम, निषा ताई कळंबे, दुर्गाता बुराडे,श्रीमती सुलभा हटवार, राजकुमारी लिल्हारे, सीमाताई गौपाले, समस्त विकास फाऊंडेशन महिला पदाधिकारी व कार्यकर्ता गण उपस्थित होतेमा.