भंडारा पत्रिका / प्रतिनिधी शहापुर :- सार्वजनिक आदर्श गणेश उत्सव मंडळ शहापूर वर्ष २५ वे येथे गणेश स्थापना करण्यात आले. सार्व. आदर्श गणेश उसव मंडळ तर्फे शहापूर येथील हनुमान मंदिर रामनगर बाजार टोली हे पुरातन मंदिर असून या मंदिरासोबत अनेक भाविकांचे श्रद्धा जोडलेली आहे. इथे दररोज सकाळ संध्याकाळ अनेक भाविक या मंदिरात पूजा अर्चना करण्याकरिता येत असतात. अनेक वर्षापासून या मंदिराचे जिर्णोद्धार आर्थिक निधी अभावी होऊ शकले नाही. भविष्यात या मंदिराचे जिर्णोद्धार करण्याचे नितांत गरज असल्यामुळे आपल्या निधीतून दहा लाखाचे निधी या मंदिराच्या जीर्णोरदरासाठी उपलब्ध करून देण्यात यावे असे निवेदन मंडळाचे अध्यक्ष नाना भुरे तसेच महिला मंडळ किरन भुरे, नलु बागडे, रेखा कावळे, मंगला सोनवणे,गीता शहारे, वैशाली फटिंग, वंदना भुरे,भारती भोंदे, पिंकी कळंबे, गौरी भुरे, सपना सोनवणे, कुंदा मुळे, रेखा नान्हे, यांनी आमदार भोंडेकर साहेबाना दिले. त्यावर भोंडेकर यांनी मंडळला आश्वासन दिले.
त्यानिमित्त आमदार भोंडेकर यांनी भेट देऊन शहापूर येथील बाजार टोली , राम नगर येथील हनुमान मंदिर जवळील सार्वजनिक आदर्श गणेश उत्सव मंडळ शहापूर गणेशोत्सव निमित्त स्थापनेपासून ते गणेश मूर्ती विसर्जनापर्यंत घेण्यात येणाºया कार्यक्रमाचे यावर चर्चा केली. सार्वजनिक आदर्श गणेश मंडळाचे अध्यक्ष नाना भुरे यांनी आमदार नरेंद्र भोंडेकर यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले त्यावेळी मंडळातील सदस्य समीर भजनकर, अनुप भुरे, बालू भुरे, सुनील कळंबे, हेमंत बागडे, मयूर वैद्य, अमर भुरे, आदित्य कळंबे, रजत भुरे, रोहन लोखंडे रोशन कोसरे, कशिश मळामे, विश्वजीत सोनवणे, दादू पडोळे, कुणाल नागोसे, विश्वजीत सोनवणे, आदित्य कळंबे, श्रेयस तरारे, साहिल वैद्य, आदित्य मांडवकर,प्रणय ठाकूर आदी उपस्थित होते.