सुगंधित तंबाखू तस्करांच्या मुसक्या आवळल्या

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली :- गोपनीय माहितीच्या आधारावर तालुक्यातील सानगडी येथील नवेगावबांध फाट्यावर नाकाबंदी करून इनोव्हा गाडीतून सुगंधित तंबाखूची तस्करी करीत असलेल्या तस्करांना उपविभागीय पोलिस विभागाच्या चमुने पकडले. सदर कारवाई मध्ये पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेऊन ८ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

१५ आॅक्टोंबर सकाळी ६ वा. दरम्यान गोपनीय माहिती मिळाली कि,MH.15.BL.5689 इनोवा गाडी मध्ये सुगंधीत तंबाखू नवेगाव/बांध कडून सानगडी कडे येत आहे. अशी माहिती मिळाल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी मनोज सिडाम व कार्यालयीन चमु यांनी सानगडी येथे नवेगाव/बांधफाट्यावर सापळा रचून सदरची गाडी थांबवून गाडी चेक केली असता डिक्की मध्ये सुगंधित तंबाखूचे ३० बोरी माल मिळाला असून चालक मुनेश्वर ताराम वय ३२ वर्ष रा.नवेगाव/बांध व मालक देवेश पटेल वय ४० वर्ष रा. नवेगाव/बांध यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन साकोली येथे गुन्हा दाखल करून माल आणि गाडी पोलीस स्टेशन जमा केले.उपविभागीय पोलिस अधिकारी मनोज सिडाम यांनी स्वत: व कार्यालयीन चमूसह सानगडी येथे नवेगाव/बांध फाट्यावर सापळा रचून ईनोवा गाडी क्र. MH.15.BL.5689ची गाडी पकडून गाडीचा डिक्की मध्ये ३० बोरी माल सुगंधी तंबाखू किं. ३ लाख ३०३४० रु. व गाडी किं.५ लाख असा एकूण ८,३०३४० रु चा मुद्देमाल जप्त करून पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनाने पोलीस स्टेशन साकोली येथे गुन्हा नोंद केला. सदरची कार्यवाही स्वत: उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज सिडाम, पो.उप.नि.चौधरी, पोलीस हवालदार प्रशांत गुरव,राजेंद्र कुरूडकर,सचिन टिचकुले,पो.ना.स्वप्निल गोस्वामी,महेश कुळमथे,पोलीस शिपाई लोकेश कोटवार,यांनी केली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *