भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्त्य साधून दि.२ आॅक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने स्वच्छता ही सेवा २०२४ ही मोहिम दि. १७ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर २०२४ या कालावधीत भंडारा जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. “स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता” थीम असलेल्या स्वच्छता ही सेवा अभियानाचा शुभारंभ दि. १७ सप्टेंबरला जिल्ह्यात सर्वत्र होत आहे. ग्रामीण आणि शहरी भागामध्ये अभियान प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन भंडाºयाचे जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी केले आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्त्य साधून दि.२ आॅक्टोबर हा दिवस सर्वत्र उत्साहात स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने दि. १७ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर २०२४ या कालावधीत “स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता” थीम असलेले अभियान भंडारा जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. उद्या १७ सप्टेंबरला स्वच्छता ही सेवा अभियानाचा जिल्ह्यात सर्वत्र शुभारंभ होत आहे. स्वच्छता भागिदारी, संपूर्ण स्वच्छता व सफाईमित्र शिबिर या तिन घटकांवर स्वच्छता ही सेवा अभियान लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. स्वच्छता ही सेवा अभियान कालावधीमध्ये दैनंदिन उपक्रम राबविले जाणार आहे. त्यामध्ये १७ सप्टेंबर ला सार्वजनिक स्वच्छतेने जिल्हा, तालुका व गावस्तरावर अभियानाचा शुभारंभ होईल.
१८ सप्टेंबर स्वच्छता सुरक्षा शिबिर होईल. यामध्ये स्वच्छता कर्मचाºयांची सह- कुटूंब आरोग्य तपासणी होईल व विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी सुरक्षा कवच कॅम्प आयोजित करणे. १९ सप्टेबर ला एकदिवस श्रमदानासाठी उपक्रमाचे आयोजन होईल्. यामध्ये सार्वजनिक ठिकाणे, शासकिय, निम्नशासकिय कार्यालये, संस्थात्मक इमारती, बाजारपेठा, सार्वजनिक वाहतूक केंद्र, प्रमुख रस्ते आणि महामार्ग, पर्यटन स्थळे, रेल्वे स्थानके, धार्मिक, अध्यात्मीक स्थळे, ऐतिहासिक वास्तु, वारसास्थळे, नदी किनारे, घाट, नाले, आदी ठिकाणी स्वच्छता श्रमदान करायचे आहे. २० सप्टेंबर ला खाऊगल्लीमध्ये स्वच्छमा मोहिम, लोकसहभागातून शास्त्रयुक्त पध्दतीने कचºयाची विल्हेवाट लावणे आणि अस्वच्छ ठिकाणाची कायमस्वरुपी स्वच्छता करण्यावर भर दिला जाईल. २१ सप्टेंबर ला सांस्कृतिक कार्यक्रम, गर्दीच्या ठिकाणी स्वच्छतेवर आधारीत संगीत, नृत्य प्रकार, संस्कृति दर्शन, नाटक, पथनाट्याचे आयोजन करणे. २२ सप्टेंबर ला एकल प्लॉस्टीक (रवढ) न वापरण्याबाबत जनजागृती करणे, शुन्य कचरा उपक्रम तसेच तीन आर उपक्रम राबविणे. २३ सप्टेंबर गृहभेटीद्वारे जनजागृती करुन ‘एक झाड आई’च्या नावे उपक्रम राबविणे. २४ सप्टेंबर ला स्वच्छता ज्योत, मेरेथॉन, सायकल मेरेथॉन, स्वच्छता रैली, मानवी साखळीचे आयोजन करणे.
२५ सप्टेंबर ला टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु तयार करणे,कचरा वर्गीकरणावर चर्चा, कविता, पोस्टर, पेटिंग, घोषवाक्य स्पर्धा तसेच प्रश्न मंजुषा, विविध खेळ शाळा व महाविद्यालयांमध्ये आयोजीत करणे. २६ सप्टेंबर ला सार्वजनिक शौचालयाची साफसफाई, दुरुस्ती व स्वच्छता संवाद, २७ सप्टेंबर ला कचरा साचून असलेल्या भागांची स्वच्छता व स्वच्छ वार्ड स्पर्धा, २८ सप्टेंबर ला वैयक्तिक स्तरावर कंपोस्ट खत खड्डा, शोष खड्डा निर्मिती करणे. २९ सप्टेंबर ला स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) अंतर्गत निर्मित प्रकल्पांचे उदघाटन करणे. ३० सप्टेंबर ला स्वच्छतेचे वाहने व उपकरणांची स्वच्छता व सुशोभिकरण करणे. १ आॅक्टोबर शाळा, महाविद्यालये, संस्थात्मक कार्यालये, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता प्रतिज्ञा घेणे तसेच सेल्फी पॉइंट. २ आॅक्टोबर ला स्वच्छता दिवस साजरा करणे, ग्रामसभेमध्ये वैयक्तीक स्तरावर घनकचरा व सांडपाण्याचे व्यवस्थापन करणाºया कुटूंबांचा गौरव करण्यात येईल.
स्वच्छता ही सेवा २०२४ अभियान भंडारा जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून जिह्यात स्वच्छता ही सेवा अभियाची प्रभावी अंमलबजावणी करण्यचे आवाहन जिल्हाधिकारी मा. डॉ. संजय कोलते यांनी केले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे यांचे मार्गदर्शनात, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पा.व स्व.) माणिक चव्हाण यांचे नेतृत्वात स्वच्छता ही सेवेचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद येथील अधिकाºयांची तालुक्याकरीता नियुक्ती करण्यात आली आहे. गट विकास अधिकारी यांचे नेतृत्वात पंचायत समिती अंतर्गत विभाग प्रमुखांची संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करून त्यांना अभियान अंमलबजावणीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ग्राम पंचायत स्तरावर सरपंच, सचिव, ग्रामविकास अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्राम पंचायत व विविध समित्या बचतगट, ग्राम संघ, तरूण मंडळे यांचे सहाय्याने लोकसहभागातून स्वच्छता ही सेवा अभियान राबविले जाणार आहे.