भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : नालंदा लोककला मंच व बहुउद्देशिस संस्थेच्या वतीने ९ सप्टेंबर २०२४ सोमवार रोजी, आय एम ए सभागृह भंडारा येथे ‘‘बेटी बचाव’’ या विषयांतर्गत संगीतमय प्रबोधनाचा कार्यक्रम घेण्यात आला.याप्रसंगी भंडारा शहरातील सहा नामावंत आणि कामवंत डॉक्टर्स महिलांना “महिला डॉक्टर सेवा पुरस्काराने” सन्मानित करण्यात आले. डॉ.मंजुषा रंगारी ,डॉ. पद्मजा जोगेवार , डॉ. प्रांजली पडोळे , डॉ.अश्विनी भोंडेकर, डॉ. सुचिता घडसींग आणि डॉ.निशा भवसार यांचा त्यामध्ये समावेश होता . यावेळी संस्थेचे सचिव सुशील खांडेकर यांनी मार्गदर्शन करतांना, एका महिलेला अजून कोणता सर्वोच्च पुरस्कार देऊ शकतो ? त्याच महिलेला अजून कुठल्या प्रकारचा सर्वोच्च स्थानी बसवू शकतो ? ते आपणच ठरवु शकतो. सरकार जरी इमाने इतबारे बेटी बचाओ – बेटी पढाओ ही संकल्पना राबवत असली, तरी एकीकडे तिचा छळ केल्या जावा, व येणाºया उत्सवात तिला देवीच्या ठिकाणी ठेवून आई-आई असा निरंतर जाप केल्या जावा आणि दुसरीकडे तिच्या अब्रूचे धिंडवडे वुडवून तिच्या आबरू ची लक्तर चौका चौकात रस्त्याला फेकून द्यावे, ही काय विडंबना आहे.
ज्या महिलेला आम्ही आई , बहीण , प्रेयसी, पत्नी, म्हणतो आणि दुसरीकडे तिच्याच पदराला छीन्न विछिन्न करून जातो.काय ही वासनांध प्रवृत्ती, काय ही पाशवी मानसिकता. या भारताच्या भूमीवर कित्येक नर वीरांना जन्म घालणाºया त्या आईला अजून किती दिवस तिच्या हक्काच्या जागेपासून वंचित ठेवणार आहोत ? ‘‘बिटिया तुम पर नाज है “या कार्यक्रमाचे आयोजन करत असताना कित्येक बड्या चेहºयांनी आर्थिक मदत करण्याचे वचन दिले, पण पटकन वातावरण, माहोल बदलावा तशी मानसिक प्रवृत्ती बदलताना आम्ही पाहिली , तर काही सद्गृहस्थ बोले तैसा चाले या उक्तिवर खरे ठरले, असेच म्हणता येईल.‘‘महिला डॉक्टर सेवा पुरस्कार ’’ देऊन आम्ही त्या महिलांवर काही उपकार करीत नाही. उलट त्यांना पुरस्कृत करून आम्ही आपल्या विकृत मानसिकते बद्दल माफीच मागत आहोत, असेही खांडेकर यावेळी म्हणाले. आम्हाला कितीही अडचणींना तोंड द्यावे लागले तरी आम्ही हेअभियान तेवत ठेवू. लाज वाटते सांगायला की आज विश्वगुरू होण्याकडे वाटचाल करणाºया भारतात स्त्रीला अजूनही दुय्यम दर्जा दिल्याचे दाखले मिळत आहेत . स्त्री उपभोगाची वस्तू असल्यासारखी मानसिकता वाढवून, काही असामाजिक बांडगुळं जगताहेत मिरवताहेत .‘‘महिला डॉक्टर सेवा पुरस्कार’’ नालंदा लोककला मंच बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून महिलेच्या कर्तुत्वाच्या खरे प्रमाण आहे. किंबहुना तिच्या केलेल्या अपमानाची माफी आहे .