प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्त्याची लागली ‘वाट’

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत लोहारा ते सोरना, लंजेरा, पिपरिया, पिटेसूर, रोंघा रस्ता पॅकेज क्रमांक ०६६९ प्रग्रायोजना टप्पा ३ अंतर्गत सन २०२०-२१ मध्ये मंजूरअसून सदर रस्त्याचे काम मे. ए. ए. रिजीवी कंत्राटदार तुमसर यांच्या मार्फत या रस्त्याचे डांबरीकरण काम माहे नोव्हेंबर २०२३ मध्ये पूर्ण करण्यात आले. सदर रस्त्याची एकूण मंजूर लांबी ८.५९० किमी असून एकूण निविदा किंमत रुपये ३३९.०६ लक्ष आहे. सदर रस्ता हा ईतर जिल्हा मार्ग दजार्चा आहे. सदर रस्त्यापासून बावनथळी नदी जवळ असल्याने या नदीवरील चिखला, देवनारा व चांदमारा घाटवरून रेतीची जडवाहतूक या मार्गावरून होत असल्याचे संबंधित अधिकाºयांकडून पत्रात सांगण्यात आले. सदर रस्ता पुढे जांब येथे तिरोडा तुमसर रामटेक राष्ट्रीय महामार्गाला मिळतो.

सदर रस्ता निकृष्ट बांधकामामुळे या मुख्य रस्त्याला मोठ-मोठे खड्डे पडले आहे. ते खड्डे अजूनही कायम आहेत. पावसाचे पाणी खड्ड्यात जमा होऊन या रस्त्यावर लहान मोठे-अपघात घडत आहेत. सदर निकृष्ट बांधकामामुळे मुख्य रस्त्यावरील डांबरमिश्रित खडी बाहेर निघत असून खड्ड्यांचा आकार वाढत आहे. याबाबत शिवसेनेचे विभाग प्रमुख तथा स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित एच मेश्राम यांनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता व अधिक्षक अभियंत्यांकडे तक्रार केली होती. त्याअनुषंगाने कार्यकारी अभियंता प्रफुल्ल केळकर, सहाय्यक अभियंता विजया सावरकर, ऋतुजा वंजारी, प्रणित फूनसे, ज्ञानेश्वर हत्तीमारे, कंत्राटदार ए ए रिजीवी यासह संबंधित अधिकाºयांनी मौकास्थळी येऊन थातूरमातूर चौकशी केली. सदर रस्ता दुरुस्ती करण्याचे आश्वासन कंत्राटदाराने संबंधितांना व गावकºयांना दिले होते.

मात्र दीड महिना लोटूनही या रस्त्याची डागडुजी करण्यात आली नाही. त्यामुळे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे अभियंता व बांधकाम कंत्राटदार यांच्यावर नागरिकांचा संताप असून साटेलोटे असल्यानेच रस्त्याबाबत वरिष्ठ अधिकाºयांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असून याप्रकरणी संवेदनशीपणे दखल घेतली जात नसल्याचे दिसून येते. संबंधित कंत्राटदाराच्या हलगजीर्मुळे आदिवासी बहुल भागातील लोहारा, सोरना, लंजेरा, पिपरिया, पिटेसूर व रोंघा येथील येण्याजाणाºया नागरिकांना रस्त्यावरून रहदारी करताना मनस्ताप सहन करावा लागत असून येथे अपघात घडत आहेत. लोहारा ते रोंघा रस्ता चौकशी दरम्यान शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित एच मेश्राम, युवासेनेचे जिल्हा समन्वयक मनोज चौबे, रोंघा ग्रामपंचायतचे उपसरपंच अतुल मांढरे, शेतकरी संघटनेचे इंजि. राजेंद्र पटले, शिवसेनेचे शाखा प्रमुख रोशन ढोके, योगेश चिंधालोरे यासह शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *