भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया:- बांगलादेशातील पंतप्रधान शेख हसीना यांना तडकाफडकी आपल्या देशातून पलायन करण्याची नामुष्की ओढावली. त्यांना तात्पुरत्या भारतात शरण देण्यात आली आहे. मात्र त्यानंतर बांगलादेशात माजलेल्या हिंसाचारात तेथील अल्पसंख्यक समुदाय असलेल्या हिंदु, क्रिश्चन आणि बौद्ध बांधवांवर दिवसेंदिवस होणा-या अत्याचारामुळे तसेच बांग्लादेशातील हिंदूचे मंदिर, क्रिश्चन धर्मीयांचे चर्च आणि बौद्ध बांधवांचे विहार तसेच बुद्धमूर्तींना तोडण्याचे सुरू झालेले सत्र काही थांबता थांबेना अशी परिस्थिती बांगलादेशात निर्माण झाली आहे आणि हे सातत्याने मागील दीढ महिण्यापासून सुरू असून अदयापपर्यंत थांबलेली नाही या सर्व बाबीचा मोठ्या प्रमाणावर निषेध करण्याकरिता गोंदियातील सकल हिंदू समाजाच्या वतीने रविवार २२ सप्टेंबर रोजी एक जनआक्रोश महारैलीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती हिंदू सकल समाजाच्या वतीने रविवार १५ सप्टेंबर रोजी शासकिय विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत देण्यात आली.
२२ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता या रैलीची सुरूवात प्रशासकिय ईमारत परिसर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून सुरू होणार असून गुरूनानक वॉडार्तून जुना बस स्टैंड होत बैंड पार्टी लाईन ते चांदनी चौक, ते गांधी प्रतिमा चौक पासून गोरेलाल चौक ते दुगार्चौक, ते विकास मेडिकल समोरून लक्की स्टोर्स ते मेन रोड पासून श्री टॉकीज चौक ते बजरंगदल कार्यालयाची गली पासून तर नेहरू चौका ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात या रैलीचे समापन एका मोठ्या सभेत होणार आहे. या प्रसंगी आयोजित सभेत आयोजक मंडळी हिंदू समाजात चेतना निर्माण करणारे मार्गदर्शन रैलीत उपस्थितांना करणार आहेत.
या रैलीच्या आयोजनाकरिता गेल्या एका महिण्यापासून आयोजक मंडळांची प्रथम अखंड आश्रम, दूसरी बैठक गौशाला येथे व तिसरी बैठकी ही अग्रसेन भवन येथे आयोजित करण्यात आली होती. त्यात गोंदिया जिल्हयातील सर्व ग्रामीण क्षेत्रातून या रैलीत जनतेच्या स्वयंस्फूतीर्ने येण्याची व्यूहरचना आखण्यात आली. यानुसार २२ सप्टेंबर रोजी आयोजित या रैलीत १० हजारापेक्षा जास्त नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आयोजक मंडळींनी व्यक्त केली आहे. रविवार १५ सप्टेंबर रोजी शासकिय विश्राम गृहात आयोजित पत्र परिषदेला सकल हिंदू समाजाचे सुभाष बैस, देवेश मिश्रा, विनोद हरिणखेडे, प्रितम लिल्हारे, अजय यादव, सुनिल चावला, हर्षल पवार, गुड्डु चांदवानी, हरिश अग्रवाल, अनिल मेश्राम, नितीन जिंदल, देवकिशन यादव, मुकेश दहीकर, राजेश कनौजिया, दारा बैरिसाल, दयार्नोगल आसवानी, चोईथराम गोपलानी, रतन वासनिक आदि उपस्थित होते.