नागपूर : महायुतीच्या तीनही नेत्यांनी जागा वाटपासाठी ८० किंवा ९० अशा कुठल्याही आकड्याचा आग्रह धरला नाही. जेथे अजित पवार जिंकतील तेथे त्यांचा आग्रह, जिथे शिंदे गटाचे आमदार जिंकतील तेथे त्यांचा आग्रह व जेथे भाजपचे उमेदवार जिंकतील तेथे आमचा आग्रह मान्य करू. आम्ही जिंकण्यासाठी लढण्याचा फाम्युर्ला निश्चित केला असून आजवर ७० टक्के जागांवर एकमत झाले आहे, असे भाजपचे प्रदेश अध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
महायुतीत ७० टक्के जागांवर एकमत
