भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- अनंत चतुर्दशी निमित्त नवीन प्रशासकीय इमारती समोर अपना गणेश उत्सव मंडळातर्फे आयोजित ‘हर हर शंभू’ या शिवस्तोत्राच्या सुप्रसिद्ध गायिका अभिलिप्सा पांडा आणि मराठी चित्रपट अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी सुरेल गायनाचा कार्यक्रम सादर करून गोंदियाकर गणेश भक्तांची मने जिंकली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले व गोंदिया चे माजी पालकमंत्री व आमदार परिणय फुके, माजी आमदार राजेंद्र जैन, भाजपचे संघटन मंत्री वीरेंद्र अंजनकर यांच्यासह आयोजक गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व अपना गणेशोत्सव मंडळाचे संयोजक पंकज रहांगडाले, अपना गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष दीपक मालगुजर, वसंत ठाकूर, दुर्गा ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते. या प्रसंगी उपस्थित त्यांना संबोधित करतांनी माजी मंत्री व आमदार डॉ.परिणय फुके यांनी या अप्रतिम कार्यक्रमाला दाद दिली.
कार्यक्रमाला पोहोचून माजी मंत्री फुके यांनी कार्यक्रमात उपस्थित हजारो श्रोत्यांना संबोधित करत भगवान श्री गणेशाचे, ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ उदघोषाने जयजयकार केले आणि बाप्पाने सर्वांवर आशीवार्दांचा वर्षाव करत राहो अशी शुभेच्छा दिल्या. डॉ. फुके यांचा गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष, आणि गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी मंडळातर्फे आमदार परिणय फुके यांचे स्वागत केले. अपना गणेशोत्सव मंडळाद्वारे आयोजित या कार्यक्रमाला गोंदिया करणे यथेच्छ गर्दी केली होती. ज्यांना आपण टीव्हीवर पाहतो असे आपल्या चाहत्या ना पाहण्याकरिता गोंदियाकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होतेै “हर हर शंभू” च्या सुप्रसिद्ध गायिका अभिलिप्सा पांडा आणि मराठी चित्रपट अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या लोकांनी मंचकावर उपस्थित होताच नागरिकांनी टाळ्यांच्या कळकाळात सह आपल्या मोबाईल चे लाईट लावून त्यांचे स्वागत केले दरम्यान अभिलीप्सा पांडा यांनी ‘हर हर शंभू’ या मंत्रोपचाराला सुरुवात करीत कार्यक्रम दणाणून सोडले यानंतर या कार्यक्रमाची दुसरे आकर्षण असलेली “अप्सरा आली” फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या चा जयघोष करीत उपस्थित जनतेकडून आपल्या सोबत जयघोष करून घेतले.
या कार्यक्रमात स्थानिक कलावंतांनी शिवतांडव आणि जय महाकाली असे नृत्य करून मनमोहक प्रस्तुती सादर केली. अपना गणेशोत्सव मंडळाद्वारे गणपती बाप्पाची मूर्ती तयार करणारे मूर्तिकार नितीन बैस आणि सुनील जांगडे या कलावंतांच्या याप्रसंगी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या समापन प्रसंगी उपस्थित तरुणाईने डी.जे.च्या तालावर नृत्य करून विसर्जन मिरवणुकीत आपला जयघोष सादर केला. कार्यक्रम समाप्त झाल्यानंतर गणेश मूतीर्ला रजेगाव येथील वाघ नदी घाटाकडे प्रस्थान करण्यात आले याप्रसंगी अपना गणेशोत्सव मंडळाचे संयोजक पंकज रहांगडाले, अध्यक्ष दीपक मालगुजर यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते.