लांडग्यांनी केली २५ शेळ्या-बकºयांची शिकार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी बारव्हा :- शिकारीच्या शोधात रात्रीच्या सुमारास गावात प्रवेश करीत १० ते १२ लांडग्याच्या टोळीने गोठ्यात बांधून ठेवलेल्या शेळ्यावर हल्ला चढवीत २५ शेळ्यां बकºयाची शिकार केल्याची घटना घडली. ही घटना दि.१७ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील मोहरणा येथे उघडकीस आली. यात पशुपालक सोनाबाई भय्याजी शेंभरकर रा. मोहरणा यांचे जवळपास २ लाख रुपयाच्या घरात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ग्रामीण भागातील बरेच शेतकरी हे शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय करतात. त्याच प्रमाणे पिढीत शेळीपालक सोनाबाई यांच्या घरी शेती नसल्यामुळे ह्या मागील काही वर्षांपासून शेळीपालन व्यवसाय करीत होत्या. व याच व्यवसायातून कुटुंबातील व्यक्तीचा उदरनिर्वाह चालवीत होत्या.

घटनेच्या एक दिवसापूर्वी सायंकाळच्या सुमारास पीडित शेळीपालकाने स्वत:च्या मालकीच्या २६ शेळ्या बकरे घरालगत असलेल्या गोठ्यात बांधून ठेवल्या होत्या. नेहमी प्रमाणे आज दि.१७ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास पशुपालक हे शेळ्यांना सोडण्यासाठी गोठ्यात गेले असता. त्यात १३ शेळयां,७ मोठे बकरे व ५ पाठरू असे एकूण २५ शेळ्या बकरे यांची शिकार केल्याचे आढळून आले. तर एक शेळी मात्र यातून बचावली. यावेळी वन्यप्राणी लांडग्याच्या हल्ल्यात २५ शेळ्यां बकरे यांची शिकार झाल्याचा संशय घेत घटनेची माहिती लाखांदूर वनविभागाला देण्यात आली. माहिती वरून लाखांदूरचे वनपरीक्षेत्राधिकारी यांच्या मार्गदर्शनात वन कर्मचारी यांनी पंचनामा केला. तसेच यावेळी प स सदस्य मंगेश राऊत यांनीही घटनास्थळी भेट दिली. यावेळी शेळीपालक सोनाबाई शेंभरकर यांनी झालेल्या नुकसानीची त्वरित भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *