भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : महाराष्टÑ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार नितेश राणे यांनी त्यांच्या फेसबुक, ट्विटर आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून कर्नाटक सरकारची खोटी बातमी प्रसारित करून व चुकीचे वक्तव्यं करून दोन समाजात तेढ निर्माण करणे, मानहानी करणे, शांतता भंग करणे असे अनेक प्रकारे केलेले आहेत. या लोक प्रतिनिधींनी खोटी माहिती पसरवून आणि धार्मिक अशांतता निर्माण केलेली आहे.
या व्यक्ती महत्त्वाच्या पदावर असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आमदार या पदावर असून त्यांनी आपली नैतिक जबाबदारी पार पाडण्यात गंभीर चूक केली आहे. करीता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार नितेश राणे तसेच इतर संबंधितपदाधिकारी आणि कार्यकर्त्यांविरूद्ध गुन्हा नोंदवुन त्यांना अटक करण्याची मागणी कॉंग्रेसतर्फे करण्यात आली आहे. याविषयी भंडारा जिल्हा कॉंग्रे्रस कमेटीचे अध्यक्ष मोहन पंचभाई यांच्या नेतृत्वात भंडारा पोलीसात तक्रार नोंदविण्यात आली असुन त्यावर एफआयआर नोंदविण्याची मागणी करण्यात आली आहे. राज्यातील युतीचे सरकार सामाजिक सलोखा बिघडविण्याचे प्रयत्न करीत असुन याविरोधात कॉंग्रेसतर्फे वेळोवेळी आवाज उठविला जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला.