नियमित कर्ज फेडणाºया मृत शेतकºयांच्या वारसानांही लाभ

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : नियमित कर्जफेड करणाºया शेतकºयांना प्रोत्साहन लाभ म्हणून ५० हजार रुपयांचा लाभ देण्यासाठी आधार प्रमाणीकरणासाठी जिल्हा उपनिबंधक भंडारा या कार्यालयाकडून मोहीम राबविली जात आहे. मात्र, त्यापूर्वीच हजारो मृत्यू झालेल्या शेतकºयांना लाभ देता येत नव्हता. आता या मृत शेतकºयांच्या वारसांनाही बँकांकडे वारसा नोंद केल्यास लाभ मिळेल. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेचा लाभ मिळविण्यासाठी आधार प्रमाणीकरणाची मुदत १८ सप्टेंबर होती. मात्र अद्याप काही पात्र लाभार्थी शेतकºयांचे आधार प्रमाणीकरण प्रलंबीत असल्याने आधार प्रमाणीकरणाची मुदत दिनांक ३० सप्टेंबर पर्यत वाढविण्यात आली आहे.

भंडारा जिल्ह्यातील एकूण ६२८४४ लाभार्थी यांचा डाटा पोर्टलवर अपलोड करण्यात आला होता त्यापैकी आत्तापर्यंत ४७८९७ पात्र लाभार्थीच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. आतापर्यंत एकूण ४६५८१ पात्र लाभार्थ्यांना रु.१५७.३८ कोटी रु. चा लाभ त्यांचे बँक खात्यावर जमा करण्यात आलेला आहे. आत्तापर्यंत एकूण ४७८९७ पात्र लाभार्थीपैकी ४७२२५लाभार्थी शेतकºयांचे आधार प्रमाणीकरण झाले असून ६७२ लाभार्थी यांचे आधार प्रमाणीकरण शिल्लक आहेत. यास्तव भंडारा जिल्ह्यातील शिल्लक पात्र लाभार्थी शेतकºयांनी आपले सरकार केंद्र, सीएससी केंद्र येथे जाऊन आपले आधार प्रमाणीकरण करून घ्यावे तर मयत शेतकºयांच्या वारसांनी त्यांचे कागदपत्रे संबंधित बँकेत विहित कालावधीत सादर करून वारस नोंद करावी, असे आवाहन शुद्धोधन कांबळे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था भंडारा यांनी केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *