भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : इस्लाम धर्मात पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिवसाला मोठ महत्व आहे. पैगंबर हजरत मोहम्मद यांचा जन्मदिन ‘ईद मिलाद उन-नबी’ म्हणून साजरा करण्यात येतो. ईद मिलाद उन-नबीच्या दिवशी घरं आणि धार्मिक ठिकाणं आकर्षक रोषणाईनं सजवल्या जातात, प्रार्थना केली जाते. ठिकठिकाणी मिरवणुका काढल्या जातात.या दिवशी पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या पवित्र वचनांचे, कुराणाचे पठण केले जाते. इस्लाममध्ये दान करण्याला मोठं महत्व आहे. ईद-ए-मिलाद-उन-नबी च्या निमित्ताने या दिवशी गरीबांमध्ये अन्नदान केले जाते. इस्लाम कॅलेन्डरच्या तिसºया महिन्यातील १२ तारखेला, इसवी सन पूर्व ५१७ मध्ये पैगंबर हजरत मोहम्मद यांचा जन्म झाला होता. सर्वात आधी हा सण इस्त्रायलमध्ये साजरा करण्यात येत होता. त्यानंतर अकराव्या शतकापासून जगभरात हा सण साजरा करण्यात येऊ लागला. ईद-ए-मिलाद-उन-नबी च्या निमित्ताने सर्वत्र मिरवणूका काढण्यात येतात. पैगंबरांचा संदेशाचा सर्वत्र प्रसार करण्यात येतो. ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त मोहाडी येथे जामा मस्जिद कमेटी मोहाडी द्वारा सोमवार दि.१६ सप्टेंबर २०२४ ला जुलूस काढण्यात आला.
यावेळी संपूर्ण मोहाडीतील मुस्लिम बांधव व बाल मंडळी यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेऊन ईद ए मिलाद शांततेने साजरा केला. यावेळी असामाजिक तत्वांना आळा घालण्याकरिता यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी मुख्य रस्त्यावरून रहदारीला अडथळा होणार नाही याची खबरदारी घेण्यात आली. रॅलीत जगातील मुस्लिमांचे पवित्र स्थान असलेल्या मदिना शरीफ येथील प्रतिकृतीचा देखावा आकर्षणाचा केंद्रबिंदू होता.
ईद ए मिलाद आणि गणपती विसर्जन एकाच दिवशी असल्याने कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी करिता पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे, उपनिरीक्षक कातीकराम दूधकावरा सह मोठा पोलीस ताफा रॅली सोबत सहभागी होता. रॅलीत कमिटीचे अध्यक्ष शमीम शेख, सचिव नईम कुरेशी, फिरोज पठाण, नासेर शेख, जाहिद बेग मिर्झा, रफिक बाबर शेख, मुसद्दीक मिर्झा, सलीम शेख, अनवर पठाण, मुनवर पठान, मुस्ताक कुरेशी, हाजी मुस्तकीम कुरेशी, हाजी कय्यूम शेख, अफरोज पठान, शोएब कुरेशी, आमीन कुरेशी, मिनाझ शेख, मोईन कुरेशी, आफताब कुरेशी, जमीर बाबर शेख, इरफान पठान, शमीम शेख, सरफराज शेख,अयान शेख, मुसद्दिक मिर्जा, मुदस्सिक मिर्जा, इमरान पठान, दानु शेख, एहतेशाम कुरेशी, यूनुस कुरेशी, नईम पठान,बब्बू हनफी,गनी शेख,मेहबूब शेख, मुनीर शेख,मुस्ताक शेख,फिरोज इजराइल शेख,बब्बू रज्जाक शेख,सोहैल कुरेशी,बबलू शेख,अनवर शेख आदी व संपूर्ण समाजबांधव सहभागी होता.रॅली शांततेत पार पडल्यानंतर नईम कुरेशी यांनी सर्व समाज बांधवांचे, अहले सुन्नत वल जमात कमेटी व पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे, उपनिरीक्षक कातीकराम दूधकावरा व सर्व विभागाचे आभार मानले. यानिमित्त इमामबाड़ा येथील मुस्लिम बांधवानी इमामबाड़ा येथे महाभोजनाची व्यवस्था केली होती तर गावकºयांनी मनशोक्त आस्वाद घेतला.