भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार नागपूर शहर व परिसरातील वीज वितरण जाळे अधिक बळकट करण्यासाठी महावितरणने २३८ कोटी रुपयांच्या कामांचे कार्यादेश दिले असून ७५ कोटी रुपयांच्या कामांच्या निविदा प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात विजेच्या तारा भूमीगत करण्यासाठी ४६ कोटींच्या कामालाही मंजुरी देण्यात आली आहे, असे महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सांगितले. नागपूर येथे आयोजित प्रादेशिक विभागाच्या आढावा बैठकीप्रंगी ते बोलत होते. यावेळी महावितरणचे संचाल (प्रकल्प) प्रसाद रेशमे, प्रादेशिक संचालक परेश भागवत, कार्यकारी संचालक (पायाभुत आराखडा/विशेष प्रकल्प) धनंजय ओंढेकर, आणि मुख्य अभियंता दिलीप दोडके उपस्थित होते.