भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गांधी चौक भंडारा येथे मोहन पंचभाई यांच्या नेतृत्वात या तालिबानी वृत्तीविरोधात, हिश्व प्रवृत्तीविरोधात आंदोलन करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांच्या नेत्यांकडून आपले नेते लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी यांची हत्या करण्याच्या, त्यांची जीभ कापण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. त्यासाठी बक्षीसे जाहीर केली जात आहेत. त्यामुळे राहुलजी गांधी यांच्या जिविताला भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांच्या नेत्यापासून धोका आहे हे स्पष्ट झाले आहे. दिल्लीतील भाजपाचा नेता तरविंदरसिंह मारवा याने राहुल गांधीची अवस्था त्यांची आजी इंदिरा गांधी यांच्याप्रमाणे करू अशी खुले आम धमकी दिली आहे. भाजपाचा केंद्रीय मंत्री रवनित बिड्डू यांनी राहुल गांधी यांना दहशतवादी म्हटले आहे. शिंदेच्या शिवसेनेचा गावगुंड आमदार संजय गायकवाड याने राहुलजींची जीभ कापणा-यास ११ लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. तर भाजपाचा राज्यसभा खासदार अनिल बोंडे याने राहुल गांधी यांच्या जिभेला चटके दिले पाहिजेत असे वक्तव्य केले आहे.
भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या नेत्यांची ही वक्तव्ये अत्यंत गंभीर असून राहुलजींच्या जिविताला यांच्यापासून धोका आहे हे स्पष्ट झाले आहे. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मललिकार्जुन खर्गे यांनी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या संदर्भात कारवाई करण्याची मागणी केली आहे पण सरकार आणि भाजपाने अद्यापाही या धमक्या देणा-या नेत्यांवर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे हे सर्व जाणिवपूर्वक सुरु आहे हे स्पष्ट झाले आहे. राहुलजी गांधी यांची आजी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि वडील राजीव गांधी यांची हत्या देशविघातक घटकांनी केली आहे. त्यामुळे या धमक्यांना गांभीरर्यान घेण्याची गरज आहे. राहुलजी गांधी सातत्याने संसदेत आणि देशभरात सामाजिक न्यायाचा आवाज बुलंद करत आहेत. जातिनिहाय जनगणना करण्याची व आरक्षणाची ५० टक्क्यांची मयार्दा हटवून दलित, आदिवासी, ओबीसींची हिस्सेदारी वाढवण्याची मागणी केली आहे. या गोष्टींना ज्यांचा विरोध आहे ते लोक सातत्याने राहुल गांधी यांच्याबद्दल द्वेषपूर्ण वक्तव्ये करण्याची, जीवे मारण्याच्या धमक्या देण्याची सुनियोजित मोहीम चालवत आहेत. आंदोलनात राहुलजींना धमक्या देणा-या नेत्यांवर गुन्हे नोंद करून त्यांना तातडीने अटक करण्याची मागणी केली.