भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : रेती वाहतुकीचा टिप्पर सोडविण्यासाठी पाच हजार रूपयाची लाच मागणाºया वरठी पोलीस स्टेशन मधील सहायक पोलीस उपनिरीक्षकावर वरठी पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. राजेश सदाशिव बाभरे वय ५६ वर्ष. असे लाचखोर पोलीसाचे नाव आहे. तक्रारदार हे नागपूर जिल्ह्यातील रहिवाशी असुन त्यांचा रेती वाहतुकीचा व्यवसाय आहे. स्वत: च्या मालकीचा टिप्पर असून त्यामाध्यमातुन ते वाळूची वाहतूक करतात. त्यांचे टिप्पर चालकाविरुद्ध वरठी पोलीस स्टेशन येथे दिनांक १ सप्टेंबर २४ रोजी एका अपघाता संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर टिप्पर वरठी पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आला . दरम्यान सदर टिप्पर सोडविण्यासाठी वरठी पोलीस स्टेशनचे कर्मचारी ५ हजार रुपये लाचेची मागणी करीत असल्याची तक्रार दिनांक ६ सप्टेंबर २४ रोजी ला. प्र. वि. भंडारा येथे तक्रारदार यांनी दिली .
प्राप्त तक्रारीच्या आधारे एसीबीच्या अधिकाºयांनी ६ सप्टेंबर २४ रोजीपडताळणी केली असता आरोपींनी पंचासमक्ष लाचेची मागणी करून तडजोड अंती २ हजार रुपये लाच स्वत: स्वीकारण्याचे मान्य करून ती मिळवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान एसीबीच्या पथकाने दिनांक १३,१४,व १९ सप्टेंबर २४ रोजी तक्रारदार यांना सापळा रक्कम घेऊन रवाना केले मात्र सापळा कारवाई दरम्यान आरोपी सहा.पोउपनि. राजेश सदाशिव बाभरे यांना संशय आल्याने त्यांनी तक्रारदार यांचेकडून लाच रक्कम स्वीकारण्यास नकार दिला वृत्त लिहेपर्यंत सदर प्रकरणी पोलीस स्टेशन वरठी येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. सदर कारवाई दिगंबर प्रधान , पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर परिक्षेत्र, नागपूर, सचिन कदम, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नागपूर यांच्या मार्गदर्शनात ला. प्र. वि. भंडारा चे पो.उप.अधीक्षक डॉ. अरुणकुमार लोहार, पोलीस निरीक्षक अमित डहारे, पोलीस उप निरीक्षक संजय कुंजरकर, पो हवा मिथुन चांदेवार, पोना अतुल मेश्राम,पो ना अंकुश गाढवे, पो हवा. शिलपेंद्र मेश्राम, पो ना नरेंद्र लाखडे, पो शि चेतन पोटे, पोशि मयूर शिंगणजुडे, पोशि राजकुमार लेंडे, पो शि विवेक रणदिवे, पोशि चालक राहुल राऊत, मपोशि अभिलाषा गजभिये सर्व लाच लुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा यांनी केली.