भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : ग्रामीण भागातील गरजु महिलांना कर्ज देण्याचे आमिष दाखवुन महिलांची लुटमार करणाºया भारत फायनान्स कंपनीविरूध्द कारवाई करण्याची मागणी शिवसेना (उबाठा) तर्फे भंडारा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन करण्यात आली आहे. यावेळी पिडीत महिला सुध्दा उपस्थित होत्या. भंडारा शहरालगत असलेल्या गणेशपुर येथील गुजराथी कॉलनीमध्ये भारत फायनन्स कंपनी चे कार्यालय असुन तेथील कर्मचारी, एजेंट गावोगावी फिरून बचत गटाच्या महिलांशी संपर्क साधुन. गरजु महिलांना ४० हजार ते ९० हजार पर्यंत चे कर्ज आधारकार्ड आणि पॅनकार्ड वर मंजुर करून देतात.
कर्जाचे हप्ते भरपाईसाठी दर आठवड्याला किश्त बांधून देऊन दर आठवड्याला कंपनीचे एजंट वसुली करतात परंतु हे कर्ज ज्या गटातील महिला सदस्यांना देतात त्या गटातील एखादी महिला कर्ज भरण्यास असमर्थ ठरली तर त्या महिलेच्या कर्जाचा हप्ता बचत गटातील अन्य सदस्यांकडून वसूल करतात. तशा प्रकारचा करारनामा आधीच तयार करून त्यावर कर्ज घेणाºया महिलांना कोणतीही कल्पना न देता सह्या घेतल्या जातात. प्रत्येक महिला सदस्याला कर्ज देतांना इन्शुरंश च्या नावाखाली २००० ते ३००० रु. रोखीने कापल्या नंतर त्याची कोणतीही पावती न देता परत दुसºयांदा इन्शुरंश त्यांच्या कर्जावर कापून ते स्टेटमेंट मध्ये दाखविले जाते प्रत्येकाला किमान चार वेळा कर्ज घेता येते आणि प्रत्येक नवीन कर्जासाठी अशाप्रकारे दोन वेळा इन्शुरंश कापल्या जावुन कर्ज घेणाºया महिलांची सर्रासपणे लुट केली जात आहे.
कमी कागदपत्रांमध्ये सहजरित्या कर्ज मिळत असल्यामुळे महिला वर्गसुध्दा भारत फायनान्स कंपनी च्या प्रलोभनाला बळी पडतात.मात्र कर्ज घेतल्या नंतर कर्जाच्या दुप्पटीने त्याची वसुली कंपनीतर्फे केली जात असुन त्याकरीता कंपनीचे एजंट महिलांना मानसिक त्रास देत आहेत. भविष्यात या त्रासाला कंटाळुन एखादी अप्रिय घटना घडु नये याकरिता कर्जदारांची लुट करणाºया भारत फायनान्स कंपनी विरोधात गुन्हे नोंदवुन कडक कार्यवाही करण्याची मागणी निवेदनातुन करण्यात आली आहे.