गोवर्धन निनावे/ भंडारा पत्रिका भंडारा : सन्मित्र गणेश उत्सव मंडळाच्या वतीने गणेशपूरच्या लाडक्या गणपती बाप्पाचे ७ सप्टेंबर रोजी मोठ्या थाटामाटात आगमण झाले. यावर्षी ओडिशा राज्यातील पुरी जगन्नाथाच्या प्रतिकृतीत २५ मुखी गणरायाच्या मुर्तीची स्थापना करण्यात आली. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील कानाकोपºयातून खेड्यापाड्यातील लाखोंच्या संख्येने भाविकांनी या गणेशपूरच्या राजाचे दर्शन घेतले. पहिल्या दिवशी या गणेशपुरचा राजा चे स्थापनेच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार प्रशांत पडोळे, जिल्हाधिकारी संदिप कोलते, डीवायएसपी अशोक बागुल यांनी उपस्थित राहून यांच्या हस्ते गणेशपुरच्या राज्याची स्थापना करण्यात आली. त्यानंतर प्रत्येक दिवशी गणेशपुरच्या राजाला प्रमुख पाहुणे म्हणून सुनील फुंडे, आमदार नरेंद्र भोंडेकर, माजी खासदार सुनील मेंढे तसेच माजी राज्यमंत्री नानाभाऊ पंचबुधे व प्रदेश महासचिव धनंजय दलाल, पोलिस अधिक्षक नुरूल हसन, एक्साइज आॅफिसर राठोड, भंडारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुर्यवंशी, उद्योगपती बाल्या भागवत, मुरारीजी काब्रा, डिंपल मल्होत्रा, नितीन दुरुगकर, जॅकी रावलानी, सारंग कोतवाल, डॉ. व्यास, बार असोसिएशन चे अध्यक्ष प्रभात मिश्रा, बीडीसीसी बँकेचे संचालक कैलास नशिने, नरेंद्र बुरडे, आशु गोंडाने, नरेंद्र पहाडे अश्या अनेक मान्यवर व्यक्तींनी मागील १० दिवसात भेट दिली.
तसेच वेगवेगळ्या व्यवसायिक, राजकीय, व सामाजिक संघटनेने सुद्धा या गणेशपूरच्या राजाचे दर्शन घेतले. भंडारा जिल्ह्यातील कानाकोपºयातून तसेच ग्रामीण भागातून आलेल्या भाविकांनी गणेशपूरच्या राजाचे मनोभावाने दर्शन घेतले. लाखोंच्या संख्येने आलेल्या भाविकांमुळे गणेशपूर नगरीत प्रचंड गर्दी उसळली असून भोळ्या भाबड्या भक्तांच्या चेहºयावर गणेशपूरच्या राजाचे दर्शनाच्या उत्सुकता, उत्साह, आनंद व प्रसन्नता ओसंडून वाहताना दिसत होती. भंडारा शहरातील राजीव गांधी चौक ते जिल्हापरीषद चौक तसेच गणेशपूर पर्यंतचा परीसर भाविकांनी ओसंडून वाहत होता. या गल्लीत लहान्यांपासून ते वयोवृद्धांनी सुद्धा या गणेशपूरच्या जत्रेत गर्दी केली होती. पावसाच्या दमदार हजेरीतही भाविकांचा दर्शन रांगेतला उत्साह काही कमी होत नव्हता. आपल्यावर जणूकाही वरुणाच्या जलधारा अभिषेक होतोय, अशा थाटात गणेशभक्त भिजत असूनही त्यांच्या चेहºयावर एका वेगळयाच हास्याची लकेर उमटली होती. तरुण-तरुणी आपल्या दमदार आवाजात ‘गणपती बाप्पा मोरया, अरे ही शान कोणीची, गणेशपूरच्या राजाची’ अशा घोषणा करीत असतांना संपुर्ण आसमंत दुमदुमत होते.
भंडारा जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या ‘गणेशपूरचा राजा’चा थाट, ऐश्वर्य, भव्यता, लायटिंग, पाहण्यासाठी भाविकांची प्रंचड गर्दी होत आहे. भाविकांना लवकर दर्शन मिळावे यासाठी मंडळाच्या सदस्यांची धावपळ पहावयास मिळत होती. तीन ते चार तास रांगेत उभे राहिल्यानंतर बाप्पाचे दर्शन मिळत आहे. पोलीसांचा प्रचंड बंदोबस्त असल्याने भाविकांना सोयीचे होत होते. यामुळे गोंधळ, हुल्लडबाजी, छेडखानी अशा प्रकारावर आळा बसला होता. त्यामुळे महिला व तरुणींनीही मनसोक्तपणे बाप्पाचे दर्शन घेतले. गणेशपूर नगरातील ‘गणेपूरचा राजा’ चे दर्शन घेवून बाहेर आलेल्या भाविकांना खास जत्रा अनुभवायला मिळत होती. गणेशपूरच्या मिशन ग्राउंडवर आनंद मेळावा भरला असून बाप्पाचे दर्शन झाल्यावर या आनंद मेळाव्यात लहानग्यापासून मोठेही ३० रुपये देवून मेळाव्यात एन्ट्रा करून एअर रायफलने फुग्यांचा वेध घेण्यासाठी रांग लावत आपला वेध साधतांना मनोरंजन करीत होते. तरुण-तरुणी पिज्जा, सॅन्डविच, भेळपुरी, रगडा पॅटीस तसेच इतर नास्ता खाण्याचा आनंद लुटत होते. कोल्ड ड्रिंक, ज्युस, आणि लस्सीच्या स्टॉलवरही गर्दी करतांना दिसत होती. लहान मुलांना आकर्षित करणारी विविध खेळणी, फुगे, तलवारी, धनुष्य बाण, गणपती सहित विविध देवी देवतांच्या छोट्या आकर्षक मुर्ती, भांडी, गरबा ड्रेस,चुडीदार, साड्या, शोभेचे अंलकार, मोत्याच्या माळा, इमिटेशन ज्वेलरी आणि आकाश पाळणे, मौत का कुआ अशा विविध खेळांचा आनंद लुटतांनी दिसत होते.