आचार्य चाणक्य कौशल्यविकास केंद्राचे प्रधानमंत्री यांच्या हस्ते भंडारा जिल्ह्यातील २१ महाविद्यालयाचे आॅनलाईन उद्घाटन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : व्यावसायिक शिक्षणातून कौशल्य विकास या संकल्पनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ७ तालुक्यांतील एकूण २१ महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील या २१ महाविद्यालयांमध्ये शुक्रवारी, दि. २० सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी १२ वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे या केंद्रांचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमास ग्रामीण व शहरी भागातील युवक-युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थित होणे अपेक्षित आहे. भंडारा पॅरामेडिकल कॉलेज येथे आमदार नरेंद्र भोंडेकर, एस. एन. मोर महाविद्यालय तुमसर येथे आमदार राजूभाऊ कारेमोरे, तसेच मधुकरराव पांडव कॉलेज आॅफ इंजीनिअरिंग भिलेवाडा येथे जिल्हाधिकारी भंडारा डॉ. संजय कोलते, सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा डॉ. सुधाकर झळके, जि. प. सदस्य विनोद बांते प्रत्यक्ष उद्घाटन कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थितीत होते.

जिल्ह्यात या केंद्रांमध्ये २०० ते ६०० तासांचे (साधारण: ३ महिने) NationalSkills Qualification Framework(NSQF)सुसंगत असलेले अल्पमुदतीचे अभ्यासक्रम चालवण्यात येणार आहेत. स्थानिक उद्योगांची गरज लक्षात घेऊन उद्योग आस्थापनांना लागणारे प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी युवक-युवतींना उपलब्ध होणार आहे. या आॅनलाईन कार्यक्रमास राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नवोपक्रम मंत्री, लोकसभा व विधानसभासदस्य, विधानपरिषद सदस्य उपस्थित होते. तसेच प्रत्येक महाविद्यालयाच्या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित होते. भंडारा पॅरामेडिकल कॉलेज, भंडारा ता. जि. भंडारा – २१३, कै. मनसारामजी पडोळे कला महाविद्यालय राजीव गांधी चौक,

भंडारा ता. जि. भंडारा – ७५, माऊली प्रा. आयटीआय नवीन उड्डाण पुलाजवळ, कारधापोस्ट, गिरोला ता. जि. भंडारा – १४१, मधुकरराव पांडव अभियांत्रिकी महाविद्यालय भिलेवाडा भंडारा ता. जि. भंडारा – ५१२, ओएसिस महाविद्यालय, सेंट पिटर्स स्कूलच्या बाजूला बेला भंडारा ता. जि. भंडारा ६४, नानाजी जोशी कनिष्ठ महाविद्यालय, शहापूर ता. जि. भंडारा – ४८९, आठवले समाजकार्य महाविद्यालय, स्टेशन रोड न्यू टाकळी परिसर भंडारा – १५८, प्रगती महिला कला महाविद्यालय, भंडारा ता. जि. भंडारा – ५०, केडी रामटेके हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय साकोली लाखांदूर रोड, दिघोरी मोठी ता. लाखांदूर जि. भंडारा – २९१, युनिक महाविद्यालय जैतपूर ता. लाखांदूर जि. भंडारा – २१४, श्री संताजी कला व विज्ञान महाविद्यालय (खैरी) पालांदूर ता. लाखनी जि. भंडारा – ३३६, लोकार्पण महाविद्यालय, चंद्रजगत कॉन्वेंट, स्टेशन रोडवरठी ता. मोहाडी जि. भंडारा – २१६, अनुराग कॉलेज आॅफ फार्मसी वरठी ता. मोहाडी जि. भंडारा – ४४२, विवेकानंद पॉलिटेक्निक चिखलामाईजवळ,

सीतासांवगी ता. तुमसर जि. भंडारा – २५०, मायनिंग खाजगी आयटीआय तामसवाडी ता. तुमसर जि. भंडारा – ३४१, अनुराधा पॅरामेडिकल कॉलेज, तुमसर ता. तुमसर जि. भंडारा – २०७, एस. एन. मोर कला व वाणिज्य महाविद्यालय आणि श्रीमती जी. डी. सराफ विज्ञान महाविद्यालय तुमसर ता. तुमसर जि. भंडारा – २४१, डॉ. एल. डी. बलखंडे कला व वाणिज्य महाविद्यालय, पवनी ता. पवनी जि. भंडारा – २४४, सायन्स महाविद्यालय पवनी, ता. पवनी जि. भंडारा – ५४६, वैनगंगा शारीरिक शिक्षण महाविद्यालय, नागझिरा रोड, साकोली ता. साकोली जि. भंडारा ३१७, करंजेकर अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालय, नागझिरा रोड, साकोली ता. साकोली जि. भंडारा ३२३ असे एकूण ५६७० उमेदवार तसेच मान्यवरांची उपस्थिती एकूण २१ आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रावर होती.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *