भंडारा पत्रिका/वार्ताहर खापा : येथून जवळच असलेल्या तुमसर तालुक्यातील परसवाडा देव्हाडी येथील २० वर्षांपासून अर्थातच दोन दशकापासून पाणी पुरवठा योजना ठप्प असून महाराष्ट्र जल प्रादेशिकरण ही योजना कासव गतीने सुरू आहे. गावात पाण्याची टाकी शोभेची वस्तू बनली आहे. याठिकाणी पाणीपुरवठा विभागाचे संबंधित अधिकाºयांनी व कंत्राटदाराने या योजनेच्या माध्यमातून मलाई खाल्ली. २०१८-२०१९ च्या दरम्यान तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना सुद्धा पत्रव्यवहार केले होते त्यादरम्यान काही महिन्यांमध्ये महाराष्ट्र जल प्रादेशिकरण तुमसर तालुक्यातील परसवाडा देव्हाडी, हसारा, खापा, ढोरवाडा व स्टेशनटोली हे पाच गाव जलजीवन मिशनमध्ये हस्तांतरित केले असता घराघरापर्यंत नळ गेले पण नळाला अजूनपर्यंत एकही थेंब पाणी मिळाले नाही याबाबत जिल्हा प्रशासनाला खूप पत्रव्यवहार करण्यात आले तरी काम मात्र कासव गतीने सुरू आहे.
भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजय कोलते यांना गुरुवारी निवेदन देण्यात आले. त्यात माय माऊलीच्या नळाला पाणी मिळाला नाही तर येत्या ३० सप्टेंबरला माडगी वैनगंगा नदीपात्रात जलसमाधी घेणार असल्याचे उपसरपंच यांनी निवेदनात म्हटले आहे. संतवर्य ज्ञानदेवांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी इंद्रायणी नदीच्या काठी संजीवन समाधी घेतली, जो जे वांछिल तो तो लाहो आणि जगाला पसायदान दिला त्या भूमिकेत जर माज्या माय माऊलीला न्याय मिळत असेल आणि झोपलेल्या प्रशासनाचे डोळे यामुळे उघडत असेल तर माझं मरण कधीही परवडतो असे युवासेना तालुका प्रमुख तथा ग्रामपंचायतचे उपसरपंच पवन खवास यांनी निवेदनात म्हटले. यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करताना शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित एच मेश्राम, शाखा प्रमुख रोशन ढोके, सामाजिक कार्यकर्ते शुभम गभने, ग्रामपंचायत सदस्य जयप्रकाश मोरे, अतुल डोळस उपस्थित होते.