भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : तालुक्यातील आष्टी जि. प. क्षेत्रातील मंजूर प्रलंबित कामे तात्काळ सुरु करण्यात यावे यासाठी तहसिलदार, उपकार्यकारी अभियंता तसेच उपविभागीय अभियंता यांना निवेदन देण्यात आले. आष्टी जि. प. क्षेत्रात मंजुर असलेले नाकाडोंगरी ते आष्टी रस्त्याचे काम मागील दोन महिन्या पोखरून ठेवले आहे. रस्त्यावरून येजा करतांना अनेकदा अपघात होवून काही लोकांना अपंगत्वही आले आहे.
मात्र सदर कामाचे कंत्राटदार व सार्वजानिक बांधकाम विभागाने याकडे पुर्ण दुर्लक्ष केले आहे. करीता त्या रस्त्याचे काम तात्काळ सुरु करण्यात यावे व नाकाडोंगरी ते आष्टी रस्त्यावरील महावितरणचे विद्युत पोल हटविण्यात यावे. तसेच महाराष्ट्र मध्यप्रदेशला जोडणारा तुमसर-कंटगी रस्त्यावरील मंजुर असलेला बावनथडी नदीवरील पुलाचे बांधकाम मागील १ वर्षांपासून कामे मंजूर होऊनही भूमिपूजन सुद्धा झालेले नाही. परिणामी तत्काळ ही सर्व कामे सुरु करण्यात यावी, अन्यथा नागरिकांसह चक्का जाम आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा ठाकचंद मुंगुसमारे जिल्हाध्यक्ष रा. यु. काँ. शरदचंद्र पवार यांनी दिला. निवेदन देतेवेळी राजानंद बोरकर, सतीश अग्रवाल, प्रतीक आगरे, पवन पारधी, अजय सरनागत, क्षीतीज भगत, दीपक पारधी, गिरीश भगत, सचिन मेश्राम इत्यादी मंडळी तथा मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मंडळी उपस्थित होती.