भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : भंडारा व गोंदिया जिल्ह्यातून तडीपार झालेल्या सराईत गुन्हेगाराला साकोली शहरात धारदार शस्त्र बाळगून संशयितरित्या वावरत असलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. सुशील गोपाल रामटेके (३३) रा. मोहघाटा हल्ली मुक्काम शिवाजी वार्ड साकोली असे आरोपीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार उपविभागीय दंडाधिकारी साहेब साकोली यांचे आदेश क्रमांक फौजदारी मा.क्र. ०४/२०२३ कलम ५६ (१) (अ) (ब) म.पो.का. मौजा जांभळी सडक १३/१०/२०२३ अन्वये भंडारा, गोंदिया जिल्ह्यातुन दोन वर्षाकरीता हद्दपार असतांना आरोपी सुशील गोपाल रामटेके हा मोटार सायकल क्रमांक एम एच ३६ ए.के. ७९०१ ने १९ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या दरम्यान धारदार चाकू बाळगून संशयितरित्या गडकुंभली रोडवर वावरत असताना पोलीस गस्त दरम्यान आढळून आला. दोन वर्षासाठी हद्दपार असतांना आरोपी सुशील रामटेके ला पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून धारदार चाकू व मोटरसायकल सह ५० हजार २०० रुपयाच्या मुद्देमाल जप्त केला आहे. सदरचा गुन्हा पो.उप.नी सुमित्रा साखरकर यांच्या फिर्यादीवरून आरोपी सुशील रामटेके च्या विरोधात अप क्रमांक, ५०४/२०२४ कलम १४२ महाराष्टÑ पोलीस कायदा सहकलम ४, २५ भारतीय हत्यार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.