निवडणुकीदरम्यान मतभेद बाजुला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : ‘पार्टी विथ अ डिफरन्स’ अशी प्रतिमा असलेल्या भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नागपुरात येऊन पक्षातील गटबाजीवरून पदाधिकाºयांचे कान टोचले. राजकारणात काम करत असताना अनेकदा मतभेद होत असतात. तर विविध कारणांमुळे अनेकांना उमेदवारी मिळत नाही. त्यातून गटबाजी निर्माण होते. मात्र निवडणूक काळात पक्षात अशी गटबाजी खपवून घेणार नाही. सर्वांनी अंतर्गत मतभेद बाजुला सारून एकत्रित निवडणूकीचे काम केले पाहिजे, असे प्रतिपादन अमित शाह यांनी केले.विशेष म्हणजे उपस्थित हजारो पदाधिकाºयांकडून त्यांनी ही बाब वदवून घेतली. नागपुरात विदर्भातील ६२ विधानसभांच्या प्रमुख पदाधिकाºयांच्या कार्यकर्ता बैठकीदरम्यान ते बोलत होते.

कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाचे राज्य प्रभारी भूपेंद्र यादव, राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिव प्रकाश, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, निवडणूक संचालन समितीचे अध्यक्ष रावसाहेब दानवे, मध्यप्रदेशचे मंत्री कैलास विजयवर्गीय, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, रणधीर सावरकर प्रामुख्याने उपस्थित होते. एका तिकीटासाठी अनेक दावेदार असतात. मात्र सर्वेक्षण, जातीय समीकरणे इत्यादी बाबी पाहून उमेदवारी निश्चित करावी लागते. जर तिकीट मिळाले नाही तर त्यावरून कुणीही असंतुष्ट होऊन त्यावर गोंधळ घालत आहे असे प्रकार विदर्भात दिसायला नको, असे परखड मत अमित शाह यांनी व्यक्त केले. सर्वांनी कटुता दूर सारून महायुतीसाठी मैदानात उतरले पाहिजे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचा धनुष्यबाण व अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे चिन्ह असलेल्या घड्याळीच्या उमेदवारांचा कमळाप्रमाणेच पूर्ण ताकदीने प्रचार झाला पाहिजे, असे अमित शाह यांनी स्पष्ट केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *