भंडारा पत्रिका / प्रतिनिधी आमगाव : तालुक्यातील पाऊलदौना शिवारात कत्तलखान्याकडे नेण्यासाठी निदर्यपणे बांधून ठेवलेल्या १९० गोवंशांची आमगाव पोलिसांनी सुटका केली. पाऊलदौना येथून कत्तलखान्याकडे नेण्यासाठी गावशिवारापासून २०० मीटर अंतरावर गोवंश बांधून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे पोलिस पथकाने धाड टाकून तीन शेडमध्ये दयनीय अवस्थेत बांधून ठेवलेल्या १९० लहानमोठ्या गोवंशांची सु- टका केली. गोवंशाची रवानगी गोशाळेत करण्यात आली. याप्रकरणी आमगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील पोलिस निरीक्षक तिरुपती राणे करीत आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक तिरुपती राणे, हवालदार राजू गजपुरे, खुशालचंद बर्वे, रिखीराम दसरे, हेमलता रोकडे, विनोदकुमार उपराडे, विक्रांत सलामे, दिनेश वानखेडे, असीम मन्यार, ज्ञानीराम राऊत यांनी केली.