नक्षली कमांडर चकमकीत ठार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गडचिरोली : जहाल नक्षल नेता गिरीधर याच्या आत्मसमर्पणानंतर नक्षलवाद्यांच्या दंडकारण्य विशेष विभागीय समिती सदस्य आणि कंपनी १० चा कमांडर रुपेश मड- ावी चकमकीत ठार झाला आहे. २३ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर छत्तीसगड पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती. यामध्ये एका महिलेसह तीन नक्षलवादी ठार झाले. यात रुपेशचा समावेश आहे. त्याच्यावर तीन राज्यात ७५ लाखाहून अधिक बक्षीस होते. गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी चळवळीतील प्रमुख नक्षल नेता म्हणून त्याची ओळख होती. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ सप्टेंबररोजी गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेपासून जवळ असलेल्या सुकमा जिल्ह्यातील चिंतलनार पोलीस हद्दीत येणाºया करकनगुडा, अबुझमाड जंगल परिसरात मोठ्या संख्येने नक्षलवादी असल्याची माहिती छत्तीसगड पोलिसांना मिळाली. यावरून डीआरजी, बस्तर फायटर आणि कोब्रा बटालियनच्या जवानांनी या परिसरात संयुक्त नक्षलविरोधी अभियान राबविले. दरम्यान, पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यावेळी दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला. ही चकमक जवळपास चार तास सुरु होती. घनदाट जंगलाचा फायदा घेत नक्षलवादी पळून गेले. चकमक स्थळी पोलिसांनी शोध घेतला असता रात्री उशिरा तीन नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून आले. २४ सप्टेंबरला सकाळी मृत नक्षलवाद्यांची ओळख पटवण्यात आली. यामध्ये रुपेश मडावी (४७) आणि जगदीश याचा समावेश आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *