अवैध दारु अड्डयावर सिहोरा पोलिसांची धाड; ४२ हजाराचा मुद्देमाल जप्त

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : पोलीस स्टेशन सिहोराच्या हद्दीत असलेल्या देवसर्रा येथील मोहफुलापासून दारू निर्मिती करणाºया दारू अड्डयावर आज शुक्रवार दि. २७ सप्टेंबर रोजी सिहोरा पोलिसांनी धाड टाकली. याप्रकरणी आरोपी अजय सुखदेव कोचे ४२ वर्ष व देवेंद्र सुखदेव कोचे ४१ वर्षे दोन्ही रा. देवसर्रा यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन सिहोरा येथे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळावरून दारू निर्मितीसाठी ३५० किलो सडवा मोहफास व ६० लिटर मोह फुलाची दारू व दारू निर्मितीसाठी उपयोगात आणलेले साहित्य असा एकूण ४२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल सिहोरा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन व अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन सिहोराचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मदनकर, पोलीस उपनिरीक्षक हरिदास सुरपाम, पोलीस उपनिरीक्षक मूलचंद मेश्राम, पोलीस शिपाई संतोष सिदने, निलेश गजाम, लोकेश डुंबरे व हर्षदीप भालाधरे यांना मिळालेल्या गुप्त माहिती द्वारे सापळा रचून केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *