भूमि अभिलेख कार्यालयातील लाचखोर कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : स्थानिक उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील दोन कर्मचारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले. या कर्मचाºयांना पंधरा हजार रुपयाची रोख रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. आर. जी. ब्रह्मपुरीकर मुख्यालय सहाय्यक व छाननी लिपिक प्रवीण फुलचंद गिरीपुंजे अशी लाच स्वीकारणाºया कर्मचाºयांची नावे आहेत. सविस्तर वृत्त असे की, यातील पीडित ६५ वर्षीय तक्रारदार यांची साकोली तालुक्यातील मौजा जांभळी येथे भुमपान क्रमांक ३७७ मध्ये ०.५१ हेक्टर शेती असून सदर शेती निवासी प्रयोजन करिता, टीपी करिता त्यांनी दिनांक २९/०३/२०२३ रोजी नगर रचनाकार भंडारा यांचेकडे अर्ज केला होता.

नगर रचना कार्यालय भंडारा यांनी तक्रारदार यांचे अर्जावर कारवाई करून पुढील कारवाई करिता तहसीलदार कार्यालय साकोली आणि उपअधीक्षक भूमी अभिलेख साकोली यांना पाठविली होती. त्यानुसार तक्रारदार यांनी दिनांक १६ सप्टेंबर २०२४ रोजी भूमी अभिलेख कार्यालय, साकोली येथे नकाशाच्या मोजणी करता अर्ज केला. त्याअनुषंगाने तक्रारदार दिनांक १७ सप्टेंबर २०२४ रोजी भूमी अभिलेख कार्यालय साकोली येथे गेले व आरोपी गिºहेपुंजे यांना भेटून नगर रचनाकार भंडारा यांनी केलेल्या शिफारस प्रमाणे प्लॉट ची मोजणी करण्याबाबत विचारणा केली असता त्यांनी नगर रचनाकार यांचे पत्र जुने आहे. ते चालणार नाही असे सांगितले. व नवीन पत्र आणावे लागेल असे तक्रारदार यांना बोलले. तक्रारदार यांनी त्यांना मोजणी करून देण्याची पुन्हा विनंती केली असता आरोपी प्रवीण फुलचंद गिºहेपुंजे, वय ३३ वर्ष, छाननी लिपिक व राहुल गुलाबराव ब्रह्मपुरीकर वय ४३ मुख्यालय सहाय्यक यांनी एकमेकांशी चर्चा केली.

चर्चेनुसार आरोपी राहुल गुलाबराव ब्रह्मपुरीकर यांनी आरोपी प्रवीण फुलचंद गिºहेपुंजे यांना तक्रारदार यांच्याकडे २०,००० रुपये मागण्यास सांगितले. त्यावरून आरोपी प्रवीण फुलचंद गिºहेपुंजे यांनी, जुन्या पत्रावरून मोजणी करायची असेल तर दोघांसाठी २०,००० रुपयांची मागणी केली. त्यानुसार दिनांक २५ सप्टेंबर २०२४ रोजी तक्रारदार यांनी त्या अनुषंगाने लाच लुचपत विभागाकडे तक्रार नोंद केली. दिनांक २६ सप्टेंबर २०२४ रोजीसदर तक्रारीवरून पडताळणी केली असता, पडताळणी दरम्यान दोन्ही आरोपी यांनी तडजोड अंती १५,००० रुपये लाचेची मागणी केली. आज शुक्रवार दिनांक २७ सप्टेंबर २०२४ रोजी सापळा कारवाई दरम्यान आरोपी लोकसेवक प्रवीण गिरेपुंजे यांनी स्वत:करिता व आरोपी राहुल गुलाबराव ब्रह्मपुरीकर यांचे करिता पंचासमक्ष तक्रारदार यांचेकडून १५,००० रुपयांची लाच रक्कम स्वीकारली. सदर सापळा कारवाई पो.उप.अधीक्षक डॉ. अरुणकुमार लोहार, पोलीस निरीक्षक अमित डहारे, पोलीस उप निरीक्षक संजय कुंजरकर, पोहवा मिथुन चांदेवार, पोना अतुल मेश्राम, पोना अंकुश गाढवे, पोशि राजकुमार लेंडे, पोना नरेंद्र लाखडे, पोहवा शिल्पेंद्र मेश्राम, पोशि चेतन पोटे, पोशि मयूर शिंगणजुडे, पोशि विष्णू वरठी, पोशि चालक राहुल राऊत, मपोशि अभिलाषा गजभिये सर्व लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या चमुने केली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *