भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्याची बैठक जिल्हाध्यक्ष नानाभाऊ पंचबुध्दे व प्रदेश महासचिव धनंजय दलाल महिला जिल्हाध्यक्ष सरिता मदनकर, युवक अध्यक्ष यशवंत सोनकुसरे यांच्या मार्गदर्शनात व प्रमुख उपस्थितीत दि. २६ सप्टेंबर रोजी घेण्यात आली. यामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नाम. अजितदादा पवार यांनी शासनाच्या विविध योजना लागू केल्या, राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजनेत १५०० रु. महिना प्राप्त झाल्याने महिला आनंदात असून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानन्यात आले. दरमहा रु. १५०० मिळाल्याबद्दल लाडकी बहिण योजनेला संपूर्ण पाठिंबा देण्याकरीता आणि ही योजना पुढील पाच वर्षे अखंडीत सुरु रहावी अशी ईच्छा व्यक्त करून सर्व महिलांनी बॅनरवर स्वाक्षरी करून या योजनेला व महायुती सरकार पुर्ण पाठींबा असल्याचे जाहीर केले.
यावेळी सर्व महिलांना शासनाच्या विविध योजनांची माहिती प्रोजेक्टरवर दाखवून योजनांबद्दल अवगत करण्यात आले तसेच भंडारा विधानसभा बीएलओचे प्रशिक्षण देण्यात आले व बुथ प्रमुखांना मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख उपस्थितांमध्ये सर्वश्री सौ. रत्नमाला चेटुले, अॅड. नेहा शेंडे, मंजुषा बुरडे, किर्ती गणविर, जयशिला भुरे, वंदना न्यायमुर्ती, सीमा सेलोकर, मनिषा न्यायमुर्ती, अंबिका पंधरे, सविता सयाम, कुसुम बागडे, इंदू येरकर्ड, निलिमा गाढवे, भारती लिमजे, रेखा मेंढे, देवांगना गजभिये, किर्ती कुंभरे, अनिता महाजन, नरेंद्र झंझाड, आरजु मेश्राम, राजु सलाम पटेल, नागेश भगत, हेमंत महाकाळकर, हरीष तलमले, शैलेश मयुर, लोमेश वैद्य, नरेश येवले, रुपेश खवास, रजनिश बन्सोड, अश्विन बांगडकर, लोकेश नगरे, प्रभाकर बोदेले, उमेश ठाकरे, मनिष वासनिक, प्रदीप सुखदेवे,
अरुण अंबादे, लोकेश नगरे, लोकेश खोब्रागडे, नारायणसिंग राजपूत, जवाहर निर्वाण, राहुल निर्वाण, नितीन मेश्राम, सुनील साखरकर, ओमप्रकाश चव्हाण, संजय वरगंटीवार, दयानंद नखाते, शालिक कागदे, उत्तम कळपाते, जुगल भोंगाडे, विष्णु कढिखाये, रवि लक्षणे, प्रेमसागर गजभिये, अजय बन्सोड, अरुण माकडे, दामाजी शेंडे, महादेव नान्हे, योगराज येलमुले, संजय निर्वाण, सोमेश्वर भुरे, अज्ञान राघोर्ते, मंगेश रेहपाडे, मदन भुरले, मिथुन वाल्दे, पांडुरंग लिमजे, गणेश बाणेवार, वामन शेंडे, जनराज मस्के, सुभाष तितीरमारे, राजेश वासनिक, बंटी तिवारी, तारकेश अहिरकर, प्रेम तुमसरे, सारंग घारगडे, संजय बोंदरे, दामाजी शेंडे, संदेश वासनिक, विकेश मेश्राम, संजय लांजेवार व मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.