लाखनी तालुक्यातील जनतेच्या ठेवी सुरक्षित आहेत काय?

रवि धोतरे / भंडारा पत्रिका लाखनी:- तालुक्यात १८ पतसंस्था असून त्यापैकी दोन पतसंस्था जिल्हास्तरीय नोंदणी धारक असून त्यांच्यावर जिल्हा उपनिबंधक यांचे नियंत्रण तर १६पतसंस्थांवर तालुकास्तरीय सहाय्यक निबंधक यांचे कडे कार्यभार पाहण्याचे शासन स्तरावर अधोरेखित आहे परंतु तालुक्यातील अनेक पतसंस्थांमध्ये भोंगळ कारभार असून ऐपत नसलेल्या सभासदांना दोन कोटी पर्यंत कर्ज दिला जात असल्याची विश्वसनीय माहिती आहे.

काही जिल्हास्तरीय पतसंस्था ह्या कोणत्याही प्रकारच्या विड्रॉलवर स्वाक्षरी न घेता रक्कम त्या ठेवीदाराच्या घरापर्यंत पोहोचवून देत असल्याने ह्या पतसंस्था की सावकारी दुकान हे न समजणारे कोडे आहे यातील काही पतसंस्थांची पदाधिकारी आपली रक्कम डबल व्हावी यासाठी कर्ज न देताच घेताच पतसंस्थांच्या ठेवीवरील व्याज्यात आपली रक्कम गुंतवतात असल्याचे चित्र आहे त्यामुळे या पतसंस्थांची सहाय्यक निबंधक यांनी कसून चौकशी केल्यास मोठा बाहेर घबाड बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच त्यामुळे नागरिकांच्या ठेवी सुरक्षित राहणार आहेत काही बाहेरच्या पतसंस्थांमध्ये दैनंदिन नित्यनिधी अभिकर्ता दैनंदिन रक्कम जमा करतो मात्र प्रत्यक्षात तो निधी त्या सभासदांच्या खात्यावर जमा केला जात नाही तर नित्यनिधीअभिकर्ता ती रक्कम परस्पर खर्च करून ग्राहकांना चुना लावत असल्याचे चित्र सध्या परिसरात दिसत असून त्यामुळे नागरिकांनी जागरूक होवून आठवड्याला महिन्याला आपण भरत असलेली नित्यनिधी पुस्तक पत संस्थेकडून पळताळणे गरजेचे आहे.

तसेच संबंधित पतसंस्थांचे कार्यावर नियंत्रण ठेवणा?्या अधिका?्यांनी याची कसून चौकशी करावी अशी मागणी होत आहे. दिवसभर काबाडकष्ट करून आपल्या भविष्याची पुंजी जमा करणारा मजूर कधी नित्य निधी तर कधी ठेवीच्या स्वरूपातपतसंस्थांमध्ये आपली रक्कम बचत करतो मात्र पतसंस्था मधील संचालक मंडळ व्यवस्थापक मजा मोज करत असतात तर रक्कम परत करते वेळी ग्राहकांना मानसिक शारीरिक त्रास देत असतात असेही बरेच उदाहरणे असून पतसंस्था पदाधिकारी आपले हात उंचावून “मी नाही त्यातली” या भूमिकेवर असल्याने त्याची कसुन चौकशी होणे गरजेचे आहे त्यामुळे विश्वास कुणावर ठेवावा या विवंचनेत ठेवीदार अडकले आहेत त्यामुळे आपण जमा केलेली रक्कम सुरक्षित आहे काय याची शहानिशा करणे गरजेचे झाले असून आपला निधी सुरक्षित आहे याची खात्री करणे गरजेचे आहे अन्यथा आदर्श घोटाळा झाल्याशिवाय राहणार नाही.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *