भंडारा पत्रिका / तालुका प्रतिनिधी मोहाडी : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या परवानगीने मोहाडी तालुक्यात काँग्रेस फ्लो यात्रा २८ सप्टेंबर ते २ आॅक्टोंबर पर्यंत काढण्यात आली आहे. सदर यात्रेचे उद्दिष्ट शेतमजूर, शेतकरी, बेरोजगार यांना शासकीय योजनांची माहिती देणे , वृद्ध, विद्यार्थी विद्यार्थिनी, महिला यांच्या अनेक प्रश्नांचे समाधान करणे , प्रत्येक जिल्हा परिषद , ग्रामपंचायत क्षेत्रातील समस्यावर चर्चा करणे, काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वावर होत असलेले आरोप कसे चुकीचे व खोटे आहेत हे जनतेला पटवून देणे , पक्षाच्या वाढीकरिता उपाय योजने , कार्यकर्त्यांमध्ये संघटनात्मक विषय पक्षाप्रती काम करण्याची ऊर्जा तयार करून जनसामान्यांची कामे कसे करता येतील, जनसामान्यांचे प्रश्न त्यांच्या अडचणी कोणत्या प्रकारे सोडविले जाऊ शकतात हे या यात्रेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना समजविण्यात येणार आहे.
या यात्रेदरम्यान संघटनात्मक कार्य करण्यात येणार असून कोणत्याही एका विशेष व्यक्तीचा प्रचार व प्रसार करण्यात येणार नसून यात्रेदरम्यान पक्षप्रवेश कार्यक्रम , सामाजिक भेटीघाटी , व्यक्तिगत व सामूहिक निवेदनही स्वीकारल्या जातील व ते निवेदन नवनियुक्त खासदार व काँग्रेस पक्षाचे लोकप्रतिनिधी किंवा वरिष्ठ पदाधिकारी यांच्या माध्यमातून निवेदनाचे निराकरण सुद्धा करण्यात येणार आहे. यात्रेत तालुक्यातील काँग्रेसचे सर्व प्रतिनिधी , पदाधिकारी , सरपंच ‘ उपसरपंच , सदस्य , महिला प्रतिनिधी आणि कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने सहयोग करावा असे आवाहन पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मोहाडी शहर काँग्रेस अध्यक्ष विजय शहारे यांनी केला आहे. पत्र परिषदेला विजय शहारे , सुनील गिरीपुंजे, अरविंद मनगटे , अशपाक सय्यद,गोपाल निमजे, विलास उपरीकर , लालाजी डोळस , महादेव बोंद्रे,सेवाराम डेकाटे, अनमोल शेंडे , बंटी निंबार्ते , दिगंबर मोहतुरे, रतन फुंडे , मुरलीधर नंदरधने, शिवशंकर शेंडे , दिनेश भोयर आदी उपस्थित होते.