भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : नागपूर दौºयावर असलेल्या बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी शेकडो शिवसैनिक विमानतळावर गोळा झाले असताना दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे अमरावती जिल्ह्यात अचलपूरला जाण्यासाठी दुपारी नागपूरला विमानाने पोहचले. राणे नागपूर विमानतळावर उतरल्यानंतर प्रवेशद्वाराच्या बाहेर उभे असलेल्या ठाकरे गटाच्या कार्यकत्यार्ना दिसताच शिवसैनिक संतप्त झाले व त्यांनी राणेंच्या विरोधात आक्रमक होत जोरदार घोषणबाजी केली . दरम्यान गोंधळ टाळण्यासाठी पोलिसांनी राणे यांना मागच्या प्रवेशद्वारातून बाहेर काढले. व गाडीमध्ये बसवून रवाना केले. अचलपूरला आयोजित करण्यात आलेल्या हिंदू संमेलनाच्या निमित्ताने नितेश राणे रविवारी दुपारी नागपुरात पोहचले. दरम्यान कळमेश्वर येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी उद्धव ठाकरे नागपुरात येणार असल्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक विमातळावर गोळा झाले होते.
गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तवत्यावरुन चर्चेत असलेले नितेश राणे विमानतळावरच्या बाहेर येतअसल्याचे कळताच ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. राणे यांच्या स्वागतासाठी केवळ दहा ते बारा कार्यकर्ते बाहेर उभे होते. राणे बाहेर येत असताना पोलिसांनी त्यांना प्रारंभी आतमध्ये थांबण्यास सांगितले. परंतु शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असल्याने पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता राणे यांना दुसºया मार्गाने बाहेर काढण्यासाठी नियोजन केले. मात्र शिवसैनिकांना माहिती पडताच शेकडो शिवसैनिक त्या प्रवेशद्वाराकडे धावले आणि तिथे जाऊन त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला मात्र ठाकरे गटाचे कार्यकर्ते काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. शेवटी मात्र पोलिसांच्या बंदोबस्तात राणे विमानतळाच्या बाहेर काढले गाणि गाडीमध्ये बसून त्यांना विमानतळावरुन रवाना केले.