माँ चोंडेस्वरी देवी मंदिरात भव्य भजन स्पर्धेचे आयोजन

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : विदर्भाच्या पूर्व टोकावर असलेल्या भंडारा जिल्ह्यातील उत्तर दिशेला असलेल्या सुप्रसिद्ध जागृत माँ चोंडेस्वरी देवीच्या मंदिरात यावर्षी प्रथमच भव्य भजन स्पर्धा निमित्ताने मोहाडीत १ लाख ५५ हजार ५५५ रुपयांच्या बक्षीसाकरिता सोमवार दि.३० सप्टेंबर २०२४ पर्यंत नोंदणी करण्यात आली. वेळेवर येणाºया भजन मंडळाला स्पर्धात भाग घेता येणार नसल्याचे आमदार राजू माणिकराव कारेमोरे यांनी जाहीर केले आहे. देवाची स्तुतिपर काव्यरचना साग्रसंगीत म्हणून देवाला भजणे किंवा आळविणे याला भजन म्हणतात. हा योगसाधनेतील भक्तियोगाचा भाग आहे. ही महाराष्ट्रातील एक लोककला आहे. पूर्वीच्या संतपरंपरेतील श्री संत ज्ञानेश्वर, तुकाराम, सोपान, निवृत्ती, एकनाथ, नामदेव, चोखामेळा संत रामदास स्वामी इत्यादी संतांनी अनेक भजने तयार केली आहेत. त्यांपैकी काही रचना भीमसेन जोशी आणि अन्य अनेक गायकांनी गाऊन अजरामर केल्या आहेत. स्थानिक स्तरावर संवादिनी(हार्मोनियम), मृदंग, तबला, ढोलकी, टाळ, टाळ्या यांचा वापर करून देवळात देवासमोर बसून वा घरीच संघटितपणे भजन गायले जाते.

पूर्वीच्या काळात, रिकामा वेळ सत्कारणी लागावा म्हणून किंवा बहुधा गुरुवारी भजन करण्याची पद्धत होती. दृकश्राव्य माध्यमामुळे व करमणुकीच्या इतर साधनांमुळे भजन ही संकल्पना हळूहळू लोप पावत आहे. मात्र अजूनही ग्रामीण महाराष्ट्रात ही परंपरा अनेक ठिकाणी सुरू आहे. वारकरी पद्धतीची भजने प्रसिद्ध आहेत. शहरांमधूनही निरनिराळी भजनी मंडळे अतिशय सुरेख असे भजनांचे कार्यक्रम करत असतात. काही भजनांमध्ये लोक नाचतातही. चक्री भजन एखादा अभंग भजन म्हणून गायल्यानंतर त्याच्या शेवटच्या अक्षरापासून लगेचच दुसरा अभंग म्हणण्यास सुरुवात करतात. याला चक्री भजन असे नाव आहे. सोंगी भजन या प्रकारात देवभक्ताच्या संवादाचा उपयोग सोंगे घेऊन करण्याची पद्धत आहे म्हणून याला सोंगी भजन असे नाव आहे. रिंगण भजन या प्रकारात तीन वेगवेगळी भजन मंडळे गोलाकार उभी राहून एकापाठोपाठ एक क्रमाने अभंग गातात व भजन करतात. यातून भजनाचेही रिंगण बनते म्हणून याला रिंगण भजन असे नाव आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व नवरात्रीच्या पावन पर्वावर भव्य भजन स्पर्धा आयोजित प्रथमच होत आहे. भजन स्पधेर्चे स्वरुप, स्पर्धेत सहभागी सर्व मंडळांची भजन स्पर्धा दि. २ ते ११ आॅक्टोबर २०२४ पर्यंत होईल.

भजन स्पर्धा जिला परिषद क्षेत्र, नगरपंचायत क्षेत्र, नगर परिषद क्षेत्रानुसार घेण्यात येईल. स्पर्धेत सहभागी मोहाडी व तुमसर तालुक्यातील स्पर्धकामधुन जिल्हा परीषद क्षेत्र निहाय प्रत्येकी १ नगर पंचायत मोहाडी १, नगरपरिषद तुमसर ३ अश्याप्रकारे २१ उत्कृष्ठ भजन मंडळांची सेमी फायनल भजन स्पर्धेकरीता निवड करण्यात येईल. सेमी फायनल भजन स्पर्धेतुन ११ मंडळाची फायनल स्पर्धेकरीता निवड करण्यात येईल. सेमी फायनल भजन स्पर्धा शनिवार दि. १२ आॅक्टोबर २०२४ ला घेण्यात येईल. फायनल भजन स्पर्धा रविवार दि.१३आॅक्टोबर २०२४ला होईल. समाज प्रबोधन व थोर संताचे विचार जनमाणसांत पोहचविण्याकरीता राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व नवरात्रीच्या पावन पर्वावर मोहाडी व तुमसर तालुक्यातील सर्व भजन मंडळांना निमंत्रीत करण्यात येत असून दि.२ ते १३ आॅक्टोबर २०२४ पर्यंत श्रध्दामय व मंगलमय वातावरणांत सुप्रसिद्ध जागृत माता चौण्डेश्वरी देवी मंदिर परिसरात भव्य भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले असुन मोहाडी व तुमसर तालुक्यातील सर्व भजन मंडळांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

भजन स्पर्धा प्रथम बक्षीस ५१ हजार १११ रुपये, दुसरे बक्षीस ४१ हजार १११, तृतीय बक्षीस ३१ हजार १११, चतुर्थ बक्षीस २१हजार १११, पाचवे बक्षीस ११ हजार १११ रुपये देण्यात येईल. स्पर्धेत सहभागी सर्व भजन मंडळांना २१११ रुपये उत्तेजनार्थ पुरस्कार, सम्मान चिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येईल. सेमी फायनल स्पर्धेत सहभागी २१ भजन मंडळाना प्रत्येकी ३१११ रु, उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात येईल. फायनल स्पर्धेत ५ पुरस्कार प्राप्त मंडळानंतर उरलेल्या ६ मंडळांना प्रत्येकी ५१११ रु उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात येईल. स्पर्धेतील अटी पुढीलप्रमाणे असून भजन मंडळात कमीत कमी ९ व जास्तीत जास्त ११ सदस्यांचा समावेश असेल. भजन मंडळांना समाज प्रबोधन, देवी गीत व इतर १ असे ३ भजन सादर करावे लागतील. मंडळांना स्वत:चे वाद्ययंत्र आणावे लागेल. भजन स्पर्धा सकाळी १० वाजेपासुन सुरु होईल. मंडळांनी सोमवार दि.३० सप्टेंबर २०२४ पर्यंत आमदार राजू माणिकराव कारेमोरे जनसंपर्क कार्यालय मोहाडी, तुमसर, वरठी येथे भजन मंडळ पूर्ण नाव, गाव, भ्रमणध्वनी क्रमांकसह नोदणी केली. प्रवेश फी १११ रुपये ठेवण्यात आली असून विनाकारण कोणतीही उजर तक्रार ऐकली जाणार नाही अंतीम निर्णय परिक्षकांचा राहिल असे आमदार राजू माणिकराव कारेमोरे यांनी सांगितले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *