भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्हा देखरेख सहकारी संस्था मर्या. भंडाराची वार्षिक आमसभा, संस्थेचे अध्यक्ष सुनिल फुडे यांचे अध्यक्षतेखाली, देवेन्द्र लॉन भंडारा येथे संपन्न झाली. सदर आमसभेत जिल्हा देखरेख संस्थेला संलग्न सेवा सह. संस्थांचे प्रतिनिधी हजर होते. संस्थेविषयी माहीती विषद करताना सुनिल फुंडे यांनी सांगितले की, जिल्हयातील ३६८ वि.का.सेवा सह.संस्था-जिल्हा देखरेख सहकारी संस्था, भंडाराच्या सभासद असुन वसुल भांग भाडवल रु.०.४० लक्ष आहे. संस्थेचा एकुण निधी रु.९.६८ लक्ष आहे. अहवाल वर्षात संस्थेत ३९ गटसचिव व १ शिपाई असे एकुण ४० कर्मचारी कार्यरत आहे. अपुºया कर्मचारी संख्येमुळे सेवा सहकारी संस्थेच्या कामकाजात अनेक अडचणी येत आहेत. अहवाल वर्षातील संस्थेचे लेखापरिक्षण जी.टी.ए.अॅन्ड कंपनी चार्टर्ड अकौन्टंट नागपुर यांनी केले असुन लेखा परिक्षणामध्ये कोणतेही गंभीर स्वरुपाचे वा आक्षेपार्ह / आक्षेप नोंदविले नाही.
आमसभेत गटसचिवांचे पगार, अफरातफर करणारे, संस्थेने आदेश देवुनही बदली स्थळी रुजु न होणे किंवा रुजु झालेल्या दुसºया गटसविचास चार्ज न देणे, मुख्यालयीन वरीष्ठ अधिकाºयांच्या सुचना न पाळणे याबाबत सभेला उपस्थित प्रतिनिधींच्या सर्व प्रश्नांना अभ्यासपुर्ण व मुद्येसुद कायदेशीर उत्तरे देवुन सुनिल फुंडे यांनी जनू सभाच जिंकली. शासनाकडे प्रलंबित असलेले शेतकºयांचे डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत अनुदानाची रक्कम व पात्र सेवा सह.संस्थांची सक्षमीकरणाची रक्कम लवकर संस्थांना उपलब्ध होईल यासाठी बँकेच्या स्तरावरुनही पाठपुरावा करण्याची विनंती सुनिल फुंडे यांना केली. सदर सभेनी मान्य केली. चांगल्या वातावरणात व शांततेत आमसभा पार पाडल्याबद्यल उपस्थित प्रतिनिधीचे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर.टी. आगडे यांनी आभार मानले. सभा यशस्वितेसाठी राजेश मदान, ठाकरे, भांडारकर, निंबार्ते यांनी मोलाचे सहकार्य केले.