भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : महायुती सरकार राज्यात राबवित असलेल्या महिला कल्याणकारी योजनांची माहिती समाजातील अंतिम घटकांपर्यंत पोहचवून त्याचा जास्तीत जास्त लाभ घेता यावा या उद्देशाने आज रविवार, २९ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी १२ वाजता तुमसर शहर, खापा तथा देव्हाडी जिल्हा परिषद क्षेत्रांचा तुमसर येथील राजाराम हॉल येथे भाजपचे विधानसभा अध्यक्ष इंजि.प्रदीप पडोळे यांच्या नेतृत्वात महिलांचा भव्य महामेळावा घेण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणुन बालाघाट-सिवनी लोकसभा क्षेत्राच्या खासदार सौ. भारतीताई पारधी या उपस्थित होत्या.याप्रसंगी तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्रात लाडकी बहिण योजनेचे काम यशस्वीरित्या पार पडणाºया अंगणवाडी सेविका, आशा वर्कर तसेच इतर महिला मदतनीस यांचा सत्कार करण्यात आला.
केंद्रात नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात देश महिला प्रगतीची उंच शिखरे गटात आहे. तर राज्यात महायुती सरकार देखील त्याच परिकल्पनांना अग्रस्थानी ठेऊन महिला सशक्तीकरणाचे धोरण राबवित आहे असे मत त्यावेळी भरती पारधी यांनी व्यक्त केले. त्याकरिता वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत महिला महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत भाजपने तब्बल २ हजाराहून अधिक अशा होतकरू महिलांचा त्यावेळी सत्कार केला. भाजपला क्रमांक एकची पसंती दर्शविणाºया प्रत्येक महिलांनी येत्या विधानसभा निवडणुकीत आपल्यानिर्णायक मतांचे अधिकार ठरवून टाकले आहेत. दोन्ही ठिकाणी आयोजित महिला मेळाव्यात स्वयंस्फूर्तीने स्थानिक महिलांनी आपली उपस्थीती दर्शवून महायुतीचे हात बळकट करण्यावर शिक्कामोर्तब केला. यावेळी पडोळे यांनी देखील उपस्थितांना संबोधित केले. मेळाव्याला दिलीप सार्वे, कल्याणी भुरे, गीता कोंडेवार, कुंदा वैद्य, प्रियंका कटरे, प्राची पटले, प्रीती मलेवार, कांचन पडोळे, राजेंद्र पटले, भाऊराव तुमसरे, काशीराम टेंभरे, भगवान चांदेवार, पंकज बालपांडे, मुन्ना पुंडे, सूर्यनारायण सिंह, हरेंद्र राहांगडाले, लक्ष्मीकांत सलामे, अमर टेंभरे, संतोष वहिले, नितीन धांडे प्रामुख्याने उपस्थित होते.