भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी :- येथील पंचायत समिती ची स्थापना तालुका निर्मिती बरोबर सन २००० मध्ये झाली असून येथील पंचायत समितीत कोणतीच कामे होत नसल्याने मोठ्या नावारुपाला आलेल्या पंचायत समितीला आता नाव सोनाबाई हाती कथलाचा वाटा म्हणण्याची वेळ आली आहे. लाखनी हे तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असून यात ७१ ग्राम पंचायतीचा समावेश आहे. मात्र ७१ ग्रामपंचायतीची धुरा सांभाळणारी पंचायत समितीमध्ये मोठा भोंगळ कारभार असून कोणतीही कामे होत नाही. येथील पंचायत समिती मध्ये अनेक विस्तार अधिकाºयांची पदे रिक्त आहेत. तर अनेक कामे करण्यासाठी कार्यरत अधिकाºयांची मानसिकता नसल्याने पंचायत समितीच्या आमसभेत गदारोळ झाला आणि प्रकरण कुलूप ठोकण्यापर्यंत आले. लोकप्रतिनिधीच्या प्रश्नांना अधिकाºयाांना समर्पक उत्तरे देता येत नाही. अनेकांची कामे होत नसल्याने त्यांना आल्यापावल्या परत जावे लागत असून येथील गटविकास अधिकारी नावाप्रमाणेच कार्य करीत असल्याने परिसराचा विकास खुंटला आहे. अनेक शासकीय योजनांचे लाभार्थी कार्यालयात येतात तेव्हा त्यांना येथील खंडविकास अधिकारी नावाप्रमाणेचआश्वासनाचा फुगा देवून आल्यापावली परत पाठवत आहेत.
पंचायत समितीचे पदाधिकारी व खंडविकास अधिकारी यांचे विकासाप्रती एकमत नसल्याने पदाधिकार्यांना शेवटी कुलूप लावण्यापर्यंत मजल गाठावी लागली. येथील आरोग्य विभाग नागरिकांच्या जीवाशी खेळत असून संपूर्ण पावसाळा उलटून सुद्धा साथीचे आजार बळावू नये म्हणून कोणतीही उपाययोजना केल्याचे दिसत नाही. नागरिकांचे घरकुल, गोठे, आवास योजनेचे हप्ते अडकले असून घरकुलाच्या बाबतीत अजूनही उद्धिष्ट पूर्ती झाली नाही. त्यामुळे घरकुल धारक कर्जाच्या खाईत अडकले आहेत. येथील कर्मचारी नेहमीच दौºयावर असल्याचे कारण सांगत आहेत तर नेताजी मात्र हातावर हात ठेवून मुग गिळून बसले आहेत. कोण्या एकेकाळी नावारूपास आलेल्या लाखनी पंचायत समितीला उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल अनेक प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले होते. मात्र आता कार्यरत अधिकाºयांच्या उदासीन मानसिकतेमुळे लाखनीची पंचायत समिती नाव सोनाबाई ठरली आहे.