भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : स्व.सुलोचनादेवी पारधी विद्यालय व श्री सुदामा कनिष्ठ कला व विज्ञान महाविद्यालय मोहाडी येथे २०२३२०२४ मधील इयत्ता १० व १२ वीमधील प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा शनिवार दि.२८ सप्टेंबर २०२४ ला सकाळी १०.३० वाजता खासदार डॉ. प्रशांत यादोरावजी पडोळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सरस्वती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या छायाचित्राला पुष्पमाला अर्पण करून दिप प्रज्वलित करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून सनμलॅग आयर्न कंपनीचे एच.आर.एम.सतिश श्रीवास्तव, संस्थापक नारायण तितीरमारे, सचिव प्रमोद नारायण तितीरमारे, सेवानिवृत्त शिक्षक विनायकराव स.वाघाये, नगरसेविका देवश्री विजय शहारे, ईरसाद शेख, मुकुंद साखरकर, प्राचार्य किरण देशमुख, दैनिक भंडारा पत्रिकाचे यशवंत थोटे, सिराज शेख, अफरोज पठाण यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
स्वागत गीत ट्विंकल मंदा भेंडे, गीतीका शरद नंदधने, संचिता रामप्रसाद मते, नयना विश्वनाथ मेहर, मैविश विनोद कनोजे, दीप तुळशीराम सार्वे यांनी सासो की सरगम…यावर प्रस्तुत केले. यावेळी निधी प्रकाश येळणे कुशारी, वैभवी हिरालाल बंसोड मोहंगावदेवी, रुचिका गौरीशंकर ईलमे भिकारखेडा, कृपाली नरेंद्र बावणे मोहाडी, सृष्टी महेंद्र तुरस्कर कुशारी, श्रावणी विजय बारई डोंगरगाव, आर्यन छगनलाल मेंढे मोहाडी, राजश्री दिनेश निमकर, आरती विजय मदारकर, मोहाडी, हर्षदा नरेश ढबाले महालगाव, तन्नु सहादेव वैद्य पांढराबोडी, रिया अनिल पुंडे नवेगाव, युक्ती रजत लिल्हारे सिरसोली, सुहानी राधेश्याम क्षीरसागर, वेदीका रामकृष्ण सोनकुसरे, दुर्गेस्वर योगेस्वर शेंडे, वैशाली देवानंद तुमसरे तर इयत्ता १२ वी कलामधून साजिया अफसर शेख, विज्ञान शाखेतून पलक कमलप्रसाद बिसेन या गुणवंत विद्यार्थ्यांचा आईवडिलांचा सत्कार खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या शुभहस्ते ट्राफी देऊन करण्यात आला.
याप्रसंगी मार्गदर्शन शिक्षिका हितेश्वरी चैनलाल पटले यांच्या मार्गदर्शनाखाली ट्विंकल मंदा भेंडे, गीतीका शरद नंदधने, संचिता रामप्रसाद मते, नयना विश्वनाथ मेहर, मैविश विनोद कनोजे, दीप तुळशीराम सार्वे, विपुल मनोहर झंझाड, आर्यन गजानन टाले, मोनीश रविंद्र सुरजजोशी, राजन टिकाराम डोंगरवार यांनी वातावरण बदल व त्यांचे परिणाम यावर ३० मिनीटाची नाटक प्रस्तुत केली. कार्यक्रमाला उत्तरा राजेश्वर बिसेन, रेखा चंद्रकांत चकोले, शरद नामदेव मालोदे, हितेश्वरी चैनलाल पटले, भरत आनंदराव रासे, संजय सेवकराम डोंगरे, प्रकाश लक्ष्मण सिंगनजुडे, विनायक पुरुषोत्तम शिवरकर, गोपाल पंढरी दादगाये, कुंदा नारायण तितीरमारे, हेमंत उरकुडा लोंदासे, विनोद वामनराव ढगे, नम्रता नरेश कुंभलकर, प्रकाश मुका मते, कविता वातू तितीरमारे, निर्मल गोंदल नागपुरे, उमेश विनोद कडव, ममता खवास, प्रज्ञा वसंतराव भुरे, गजानन गुलाब तितरमारे, प्रतिभा शंकर खंडाईत, कविता मंसाराम पडोळे,
प्रदीप महादेव सपाटे, विनोद प्रल्हाद बोरकर, जीवनलाल रघुनाथ सार्वे, प्रतीक्षा विनायक वाघाये, चुन्नीलाल परसराम आगासे, नरेश रामप्रसाद उईके, प्रिया प्रकाश मेश्राम, सुषमा राजाराम मानापुरे, गुंजन किशोर धार्मिक,शुभम देवचंद चिमनकर यांची उपस्थिती होती. प्रास्ताविकातून प्राचार्य किरण माणिकराव देशमुख यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ पुणेच्या वतीने प्रमाणपत्र परीक्षेत इयत्ता १० वीच्या वतीने स्व.सुलोचनादेवी पारधी विद्यालय मोहाडीच्या वतीने सन २०२३-२४ च्या माध्यमिक परीक्षेत विद्यालयाचा निकाल ९५.९६ लागला असून विद्यालयाचे १९६ विद्याथ्यार्पैकी १८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले विशेष प्राविण्य ६२ विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये ७८ व विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये ३६ विद्यार्थी पास झाले आणि शाळेची होत असलेली उत्तरोत्तर प्रगतीबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन प्रतिभा शंकर खंडाईत यांनी केले तर आभार रुपेश महादेव साखरवाडे यांनी मानले.