भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : भंडारा जिल्ह्यात मोहाडी तालुक्यातील कृषी विभाग जिल्हा परिषद भंडारा येथील संजय न्यायमूर्ती पंचायत समिती कृषी अधिकारी मोहाडी व आरसीएफ कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक अमोल लहाने यांच्या कडून तालुक्यातील रासायनिक खत विक्री करणाºया कृषी केंद्राची तपासणी सोमवार दि. ३० सप्टेंबर २०२४ ला करण्यात आली असता मोहाडी तालुक्यातील काही कृषी केंद्रामध्ये प्रत्यक्ष गोडाऊन खत साठा व पास मशीन मधील साठा यांच्यामध्ये मोठी तफावत आढळून आली आहे. त्यामुळे कंपनीचे करोडो रुपये अनुदान प्रलंबित आहेत. आरसीएफ व कृषी विभागाच्या अधिकाºयांनी मोहाडी तालुक्यातील टाकला येथील कृषी केंद्रामध्ये भेटी दरम्यान गोडाऊन मधील प्रत्यक्ष खत साठा व पॉस मशीन मधील साठ्यामध्ये तफावत आढळून आली. त्यामुळे कंपनीचे जवळपास १६ लाख रुपयाचे अनुदान प्रलंबित आहे.
तसेच जांब व कांद्री येथील कृषी केंद्रामध्ये सुद्धा तफावत आढळून आली. त्यामध्ये आॅफलाईन विक्री तथा पोझ मशीन च्या तांत्रिक अडचणी मुळे संभधिताना ५ दिवसांची मुदत देऊन साठा आॅनलाईन रित्या कमी करुन समर्पक उत्तर सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तरी याची तीव्रता लक्षात घेऊन कृषी विभाग व आरसीएफ कंपनी विक्रेत्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहे असे अधिकाºयांनी सांगितले. भंडारा जिल्ह्यात कृषी विभाग व आरसीएफ कंपनी चे अधिकारी जिल्ह्यातील प्रत्येक कृषी केंद्रामध्ये जाऊन प्रत्यक्ष गोडाऊन साठा व पॉस मशीन साठा यांची तपासणी करणार आहेत. तपासणी दरम्यान खत साठ्यात तफावत आढळल्यास खताची पॉस मशीन मधून विक्री न करता नियमबाह्य खत विक्री करणाºया कृषी केंद्रावर नवीन खताचा पुरवठा स्थगित करून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.