भंडारा प्रत्रिका प्रतिनिधी खापा (तुमसर) : जांब ते लोहारा रस्त्याच्या नाल्यावरच्या पुलीयाची उंची खूप कमी असल्याने दरवर्षी पावसाळ्यात या पुलीयावरुन पाणी वाहत जात असते यामुळे लोहारा, जांब व परिसरातील जनतेला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. सततच्या पावसामुळे व सोरणा जलाशय ओव्हर μलो झाल्या मुळे जांब ते लोहारा रस्त्यावर असलेल्या पुलीयावरुन मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने लोहारा येथील जनतेचा जांब गावासी संपर्क तुटत असतो. पुलावरून पाणी वाहत असल्याने तुमसर वरुन जांबला येणारी बस लोहारा वरुनच वापस जात असते यामुळे विद्यार्थ्यांची मोठी नुकसान होत असते आता तर या पुलावर मोठे खड्डे पडले आहेत. पुलावरुन वाहन चालवने फारकठीण झाले आहेत.
या पुलावर केव्हाही अपघात होण्याची शक्यता आहे. जांब ते लोहारा रस्त्याच्या नाल्यावर नविन उंच पुलिया बांधकाम करण्यासाठी अनेकदा संबंधित अधिकारी यांना गावकºयांनी निवेदन देण्यात आले परंतु याकडे संबंधित अधिकारीदुर्लक्ष करीत असल्याची तक्रार या परिसरातील जनतेनी केली आहे तरी संबंधित सार्वजनिक बांधकाम व पंतप्रधान ग्रामसडक विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देऊन जांब ते लोहारा रस्त्याच्या नाल्यावर असलेल्या पुलाची उंची वाढवुन नव्याने पुल बांधकाम करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल बांडेबूचे, लक्ष्मण देवगडे, रमेश लेदे, नितिन बांडेबूचे, आशिष ढोमणे, राम देवगडे व लोहारा, सोरणा, गायमुख, सोनपुरी, जांब येथील गावकºयांनी केली आहे. या नाल्यावर नवीन उंच पुलाचे बांधकाम त्वरित न झाल्यास तिव्र आंदोलन करण्याचा ईशारा सामाजिक कार्यकर्ते अनिल बांडेबूचे, लक्ष्मण देवगडे, रमेश लेदे, नितीन बांडेबूचे व या परिसरातील जनतेनी केली आहे.