भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : स्थानिक राष्ट्रीय शिक्षण संस्था द्वारा संचालित समर्थ महाविद्यालय, लाखनीतर्फे सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून आणि गांधी जयंतीच्या निमित्ताने ‘स्वच्छता ही सेवा’ अंतर्गत ‘स्वच्छमेव जयते’ या विशेष स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. २ आॅक्टोबर २०२४ रोजी हा व्यापक स्वच्छता उपक्रम लाखनी तालुक्यातील २५ गावांमध्ये एकाच वेळी राबविला जाणार आहे. या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे ग्रामस्वच्छता व सामाजिक जागरूकता वाढविणे असून, हे अभियान प्राचार्य डॉ. दिगांबर कापसे यांच्या नेतृत्वातआणि मार्गदर्शनात राबविले जात आहे.