वाघाच्या भितीने नदीत बुडून

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मूल : तालुक्यातील बोरचांदली येथील शेतकरी शैलेश प्रभाकर कटकमवार वय (४२) हा सोमवारी आपल्या म्हैसी उमा नदीच्या काठावर चराईकरिता घेऊन गेला. त्यावेळी अचानक त्याला वाघ दिसला. वाघाला घाबरुन तो नदीत गेला. परंतु, तो परत बाहेर आला नाही. त्याचा मृतदेह दुसºया दिवशी मंगळवार, १ आॅक्टोबरला सकाळी ९ वाजताच्या सुमारास गावकºयांच्या प्रयत्नाने मिळाला. शेतकरी शैलेश कटकमवार हा ३० सप्टेंबर रोजी दररोज प्रमाणे आपल्या म्हैसी घेऊन उमा नदीच्या मोठ्या पुलावर गेला होता. काही अंतरावर म्हैसी चरत होत्या. यावेळी त्याला जवळच वाघ दिसला.

वाघाला घाबरून शैलेशने म्हैसीची शेपटी पकडून पाण्यात उडी मारली. त्यामुळे वाघाच्या हल्यातून तो वाचला. परंतु, तो गावकºयांना शोधूनही दिसला नाही. याबाबत मूल पोलिसांना तक्रार देण्यात आली. महसूल व पोलिस प्रशासनाने दिवसभर व रात्रीही शोध घेतला. परंतु, प्रशासकीय यंत्रणेकडून अत्यावश्यक साधने वेळेवर उपलब्ध न झाल्याने शैलेशचा शोध लागला नाही. गावकºयांच्या पुढाकाराने ढिवरबांधवांच्या मदतीने जाळे टाकून पुन्हा शोधकार्य सुरु केले असता शैलेशचा मृतदेह हाती लागला. मृतदेह विच्छेदनसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. विच्छेदन झाल्यानंतर दुपारी १ वाजता गावकºयांच्या स्वाधीन करण्यात आला. पुढील तपास मूल पोलिस करीत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *