मुंबई : बॉलिवूड अभिनेता आणि शिवसेना नेते गोविंदा यांच्याशी संबंधित एक वाईट बातमी समोर आली आहे. आज पहाटेच्या सुमारास घरून निघत असताना त्याच्याच बंदुकीतून निघालेल्या गोळीत तो जखमी झाला आहे. ही घटना पहाटे ४.४५ वाजताची आहे. यात तो जखमी झाल असून त्याला लगेचच कृती केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले.