भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी : सोयाबीनच्या हंगामासाठी नागभीडकडून भुयारकडे येणाºया मेटॅडोरला टिप्परने मागेहुन जोरदार धक्का दिल्याने झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू तर २४ मजूर जख- मी झाल्याची घटना भुयार-कान्पा सिमेलगत मंगळवारी सकाळी १० वाजेदरम्यान घडली. यातील मृतक महिलेचे नाव गायत्री रोशन हेमने (३६) डोंगरगाव ता. नागभीड असे आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली आहे. सध्या सोयाबीन पीकांचे कापनीचा हंगाम सुरू आहे. यासाठी सदर मजूर भुयार मार्गे धुरखेडा तालुका उमरेड येथे जात होते. दरम्यान मेटॅडोरमध्ये मजुरांना नेत असतांना भंडारा जिल्हा सिमेजवळ चंद्रपूर जिल्हा हद्दीत ओव्हरटॅक करण्याच्या नादात मागेहुन धडक दिल्याने मेटॅडोर पलटला. एमएच ३४ बीजी १७२० असा अपघातग्रस्त मेटॅडोरचा नंबर आहे. सदरची माहिती नागभीड पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल झाले. जखमींना जवळच्या भुयार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले व तिथुन पुढील उपचाराकरीता पवनी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. उपचारा दरम्यान एक महिला मजूराचा मृत्यू झाला. परिस्थिती गंभीर असल्याने उर्वरित २४ मजुरांना जिल्हा रुग्णालय भंडारा येथे हलविण्यात आले आहे.
काहींना नागपूर येथेही पाठविल्याचे कळते. यातील जखमींची नावे सुष्मा योगेश हजारे रा. कसरला, शशिकला धनराज धनविजय रा कसरला, शकुंतला ढोक नागभीड, जयश्री श्रीरामे नागभीड, मंगला बागडे डोंगरगाव, मुक्ताबाई ना- रनवरे डोंगरगाव, मंगला बागडे डोंगरगाव, गोपाल नशीने पेंढरी, ज्योती गोपाल नशीने पेंढरी, रुमावती सुधाकर गजभे पेंढरी, संगीता पुरुषोत्तम श्रीरामे पेंढरी, राजू नखटू कांबडी पेंढरी, विलास दादाजी मंडपे पेंढरी, विनोद मधुकर मंडपे पेंढरी, कांता गोमा माटे पेंढरी, ममता अरुण शेरकुरे पेंढरी, मीरा श्रीराम पाखोडे डोंगरगाव, मनीषा सूभाष नन्नावरे कसरला, तनुजा शिवदास बहेमते डोंगरगाव, कांता मेश्राम पेंढरी, दुर्गा शेरकुरे पेंढरी, सुमित्रा उईके डोंगरगाव, कुसुम बोरकर डोंगरगाव, राखी सुखदेवे कसरला, संगीता श्रीरामे पेंढरी अशी आहेत. घटनेचा तपस नागभीड व पवनी पोलीस करीत आहेत.