भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- ग्राम पंचायतीच्या रोजगार सेवकाचे मानधनाच्या धनादेशावर स्वाक्षरी करण्याच्या मोबदल्यात ५ हजार रूपयाची लाच मागणाºया लाचखोर महिला सरपंचाला एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली. सरीत तुमसरे सरपंच ग्राम पंचायत इंदोरा खुर्द त.तिरोडा असे लाचखोर महिला सरपंचाचे नाव आहे. तक्रारदार हे ग्रामपंचायत इंदोरा खुर्द अंतर्गत रोजगार सेवक म्हणून कार्यरत असुन त्यांचे माहे मार्च, एप्रिल, मे व जून २०२४ या चार महिन्यांचे मानधन रक्कम रुपये ५३ हजार २०० रूपयाचा धनादेश ग्रामसेवक यांनी स्वत:ची सही करून तक्रारदाराकडे दिला. तक्रारदार हे सदर धनादेशावर सही घेण्याकरीता सरपंच श्रीमती सरीता तुमसरे यांना भेटले असता त्यांनी धनादेशावर सही करण्याकरीता तक्रारदार यांच्याकडे ५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती.
तक्रारदार यांना लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने तक्रारदार यांनी ला.प्र.वि. गोंदिया येथे तक्रार दिली होती. गोंदिया एसीबीच्या पथकाने तक्रारीच्या आधारे पडताळणी कार्यवाही केली असता सरपंच श्रीमती सरीता तुमसरे यांनी तक्रा- रदाराच्या मानधनाच्या धनादेशावर सही करण्याकरीता ५ हजार रुपये रकमेच्या लाचेची पंचासमक्ष मागणी करीत सरपंच श्रीमती सरीता तुमसरे यांनी पंचासमक्ष ५ हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारली. पोलीसांनी आरोपीला लाच रकमेसह ताब्यात घेण्यात आले असुन तिरोडा पोलीस ठाणे जिल्हा गोंदिया येथे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे. सदर कारवाई ला.प्र.वि. नागपूर परिक्षेत्र, नागपूर चे प्रधान पोलीस अधीक्षक डॉ.श्री दिगंबर , अपर पोलीस अधीक्षक सचिन कदम,अपर पोलीस अधीक्षक संजय पुरंदर यांचे मार्गदर्शनात पर्यवेक्षक अधिकारी विलास काळे, स.फौ. चंद्रकांत करपे, पो. हवा. संजय कुमार बोहरे, मंगेश काहालकर, ना.पो.शि. संतोष बोपचे, अशोक कापसे, प्रशांत सोनवाने, कैलास काटकर म.ना.पो. शि.संगीता पटले , रोहिणी डांगे, चालक नापोशि दिपक बाटबर्वे यांनी केली.